News Flash

डब्बू रतनानीसाठी ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचं फोटोशूट; कॅलेंडर शूटमध्ये करतेय डेब्यू

शहनाजने बॉलिवूडचे फेमस फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्यासाठी फोटोशूट केलंय. या फोटोशूटच्या माध्यमातून तिने कॅलेंडर शूटमध्ये डेब्यू केलंय.

Shehnaaz-Gill-1200
(Photo: Shehnaaz Gill/Instagram)

पंजाबी सिंगर आणि अभिनेत्री शहनाज गिल लाइमलाइटमध्ये येण्यासाठी कोणतीच संधी सोडत नाही. तिचं नाव नेहमीच ट्विटरवर ट्रेंडमध्ये येत असतं. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. बिग बॉस १३ मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नुकतंच तिने बॉलिवूडचे फेमस फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्यासाठी फोटोशूट केलंय. शहनाजने या फोटोशूटच्या माध्यमातून डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर शूटमध्ये डेब्यू केलंय.

डब्बू रतनानी यांच्यासाठी केलेल्या या फोटोशूटमुळे शहनाज गिल बरीच चर्चेत आलीय. यापूर्वी तिचा बॉसी लुक फॅन्ससमोर आला होता. त्यानंतर आता शहनाजने कूल लुकमध्ये हे फोटोशूट केलंय. व्हाइट शर्ट आणि कलरफुल ट्राउजरमध्ये शहनाज खूपच गॉर्जियस दिसून आली. यात तिने एलिगंट लुक ठेवलाय. या लुकमध्ये तिने ग्रीन कलकरचे हेवी नेकलेस आणि ब्रेसलेट परिधान केलं आहे. फ्लिक्स हेयरकट सुद्धा अत्यंत साजेसा वाटतो आहे. या फोटोशूटसाठी तिने कॅंडीड पोज सुद्धा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)


शहनाज गिल ही लोकप्रिय पंजाबी सिंगर आणि अभिनेत्री आहे. बिग बॉस १३ मध्ये तिचा चुलबुल अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. या शोनंतर ती रातोरात स्टार बनली. बिग बॉस १३ मधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये तिचं नाव होतं. या शोमधून बाहेर पडल्यानंतर शहनाज लागोपाठ फोटोशूट आणि म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत राहिली. बिग बॉस १३ नंतर तिने स्वतःमध्ये बरेच बदल केलेले दिसून आले. गेल्या अनेक दिवसांपासून तिचा स्टायलिश अंदाज पहायला मिळतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 11:21 pm

Web Title: shehnaaz gill looks drop dead gorgeous in her latest photos prp 93
Next Stories
1 गौहर खानने शेअर केले हनीमूनचे फोटो पण…
2 ‘The Empire’ सीरिजमध्ये शूर योद्धाच्या भूमिकेत झळकणार कुणाल कपूर, फर्स्ट लुक टीझर रिलीज
3 शिल्पा शेट्टी, राज कुंद्रासह चौघांना आता SEBI चा दणका; कंपनीने केला गैरव्यवहार
Just Now!
X