News Flash

Viral Video: ‘तुला लाज वाटली पाहिजे..’, स्टाफकडून सॅण्डल काढून घेतल्याने शहनाज गील झाली ट्रोल

सध्या एका व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी शहनाजवर नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केलंय.

(Photo-Instagram@shehnaazgill)

बीग बॉस फेम शहनाज गीलच्या क्यूट अंदाजावर अनेक चाहते फिदा आहे. शहनाजच्या व्हि़डीओला आणि फोटोंना चाहत्यांची कायम पसंती मिळताना दिसते. सोशल मीडियावरून क्वचितच शहनाजला ट्रोल केलं जातं. मात्र सध्या एका व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी शहनाजवर नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केलंय.

शहनाज गील मुंबईमध्ये सध्या एका प्रोजेक्टचं शूटिंग करत आहे. यावेळी सेटबाहेर पड़ताना शहनाजला स्पॉट करण्यात आलंय. सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. यात शहनाज सेटबाहेर येताना दिसतेय. तिच्यासोबत काही स्टाफमधील लोक आहेत. यात शहनाज एका स्टाफकडून तिची हिल्सची सॅण्डल काढून घेत असल्याचं दिसतंय. हा स्टाफ मेंबर खाली वाकून शहनाजची सॅण्डल काढतो त्यानंतर ती चप्पल घालून पुढे चालू लागते हे पाहायला मिळतंय. मात्र शहनाजच्या या वागण्याचा नेटकऱ्यांना मात्र चांगलाच संताप आलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

हे देखील वाचा: …म्हणून शाहरुख खान अक्षय कुमारसोबत काम करत नाही; किंग खानने केला होता खुलासा

शहनाजचा हा व्हिडीओ पाहून काही चाहत्यांनी पसंती दिली असली तरी काही नेटकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केलाय. शहनाजने स्वत: सॅण्डल का नाही काढली असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलंय.एक युजर म्हणाला, “इतकी चरबी आलीय की बिचाऱ्याकडून सॅण्डल काढून घेतेय.” तर आणखी एक युजर म्हणाला, “अटीट्यूड बघा किती हिचा..स्वत:ची सॅण्डल काढू शकत नाही साधी..काम नसताना अशी वागतेय काम मिळालं तर काय करेल?” असं म्हणत नेटकऱ्यांनी शहनाजवर निशाणा साधला आहे.

shahanaj-troll (photo-Instagarm@manav.manglani)

हे देखील वाचा: “इंडिया हे ब्रिटिशांनी दिलेलं गुलामगिरीचं नाव”; कंगना रणौतने देशाच्या नावावरून केलं मोठं विधान

शहनाज गीलच्या अशा वागणुकीवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत तिच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शहनाज लवकरच दिलजीत दोसांझसोबत ‘हौसला रख’ या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय काही वृत्तांनुसार ती सिद्धार्थ शुल्कासोबत एका प्रोजेक्टवर काम करतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 4:10 pm

Web Title: shehnaaz gill trolled after her video goes viral staff member removed her heels shoes kpw 89
Next Stories
1 फोटो पेक्षा कतरिनाच्या शूजची चर्चा..किंमत ऐकलीत का?
2 “आता अँटीबॉडीज लोड होत आहेत”; कार्तिक आर्यनने घेतली करोनाची पहिली लस
3 मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटात झळकणार कार्तिक आर्यन
Just Now!
X