News Flash

‘मला त्या लोकांची गोष्ट माहित आहे ज्यांनी तुला कायम हिणवलं’, दिग्दर्शकाचं सुशांतसाठी ट्विट

अनेक कलाकार सोशल मीडियावर सुशांतच्या निधनावर प्रतिक्रिया देत आहेत

सुशांत सिंह राजपूत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने धक्काच बसला आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली. नुकताच शेखर कपूर यांनी देखीस सुशांतच्या आत्महत्येवर ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

शेखर यांनी ट्विटमध्ये सुशांत कोणात्या त्रासातून जात होता मी समजू शकतो. मला त्या लोकांची गोष्ट माहित आहे ज्यांनी तुला कायम हिणवलं आहे. तेही इतकं की तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकला असता असे म्हटले आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी सुशांत सोबत असायला हवे होते अशा अशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याचा खून झाला आहे असं धक्कादायक व्यक्तव्य तिने केले. तसेच भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने तिला पाठिंबा देत बॉलिवूडवर निशाणा साधला.

सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. पण सुशांतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर सुशांतच्या निधनावर प्रतिक्रिया देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 2:41 pm

Web Title: shekhar kapur says he knew the story of the people that let sushant singh rajput down avb 95
Next Stories
1 सुशांतच्या आत्महत्येनंतर मिथुन चक्रवर्ती सुन्न; घेतला ‘हा’ निर्णय
2 ‘करण जोहर कोण आहे? काय कचरा…’ सुशांतच्या आत्महत्येनंतर बबिता फोगट संतापली
3 “हा तर त्याचा अपमान”; सुशांतबद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या कलाकारांवर संतापला सैफ
Just Now!
X