गोवा येथे पार पडणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सांगलीच्या शेखर रणखांबेच्या ‘पॅम्पलेट’ या लघुपटाची निवड झाली आहे. जगभरातल्या १६ नामांकित चित्रपट महोत्सवांपैकी हा अतिशय महत्वाचा महोत्सव आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वाचे या महोत्सवाकडे आणि त्यातून निवड होणाऱ्या चित्रपटांकडे लक्ष असते. या महोत्सवात आपला चित्रपट निवड व्हावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते.

या चित्रपट महोत्सवात जगभरातून निवडलेले चित्रपट दाखवले जातात. आठवडाभराच्या या महोत्सवात इंडियन पॅनारोमा या विभागात भारतातून २१ लघुपट आणि २४ पूर्ण लांबीच्या चित्रपटांचा समावेश प्रत्येक वर्षी होत असतो. या वर्षी महाराष्ट्रातून २ पूर्ण लांबीचे आणि ८ लघुपटांची निवड झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातून गेलेल्या आणि ग्रामीण कथानक असलेल्या ‘पॅम्पलेट’ची निवड झाल्यामुळे त्यांच्या पुढच्या कामासाठी नक्कीच बळ देणारं ठरणार आहे.

how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
panvel municipal corporation
फडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार
Renovation of Afghan War Memorial Church completed Mumbai
अफगाण वॉर मेमोरियल चर्चचे नूतनीकरण पूर्ण; ३ मार्चपासून सर्वांसाठी खुले होणार, नूतनीकरणासाठी १४ कोटींचा खर्च
Performance of Pankaj Mohit from Wadala slum in Pro Kabaddi League mumbai
प्रो कबड्डी लीग मध्ये वडाळ्याच्या झोपडपट्टीतील पंकज मोहितेची कामगिरी; पुणेरी पलटणचा आधारस्तंभ

गेल्या १२ वर्षांपासून शेखर या चंदेरी दुनियेत स्ट्रगल करत आहे. याआधी धोंडा, मूक, पंजाबी ड्रेस असे लघुपट लिहिले आणि दिग्दर्शनही केले. या लघुपटांना अनेक महोत्सवात नामांकन मिळालेली आहेत. ‘पॅम्पलेट’ हा लघुपट गोव्यात होणाऱ्या महोत्सवात २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.