18 November 2019

News Flash

‘कंगनाला ‘त्या’ मुलाखतीसाठी आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा’

तिला मिळालेले पुरस्कार किंवा तिच्या मुलाखतीमधील वक्तव्यांना आम्ही घाबरणार नाही.

Shekhar Suman again hits out at Kangana Ranaut : , कंगनाने तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली तर तुम्ही काय कराल, असे विचारण्यात आले असता, आम्ही तिला जशास तसे उत्तर देऊ, अशा निर्धार शेखर सुमन यांनी व्यक्त केला.

अभिनेत्री कंगना राणावत हिचा माजी प्रियकर अध्ययन सुमन याचे वडील शेखर सुमन यांनी पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. काल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमधील अभिनयासाठी कंगनाला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी उपरोधिक टीका शेखर सुमन यांनी केली. काही दिवसांपूर्वी शेखर सुमन यांचा मुलगा आणि कंगनाचा माजी प्रियकर अध्ययन सुमन याने कंगनावर अनेक खळबळजनक आरोप केले होते.
कंगना मला मारहाण आणि काळी जादू करायची, माजी प्रियकराचा धक्कादायक खुलासा 
कंगना आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ करायची तसेच ती माझ्यावर काळी जादू करायची, असे अध्ययनने म्हटले होते. मात्र, अशाप्रकारच्या आरोपांनी मी थोडीदेखील विचलित झाले नसल्याचे कंगनाने मुलाखतीत सांगितले होते. त्यावरून शेखर सुमन यांनी कंगनाला या मुलाखतीसाठी आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळायला, हवा असे म्हटले. तिने सर्वप्रकारचे वाईट पर्याय वापरून पाहिले आहेत. मात्र, तिला मिळालेले पुरस्कार किंवा तिच्या मुलाखतीमधील वक्तव्यांना आम्ही घाबरणार नाही. माझ्या कुटुंबाने याअगोदरच खूप सहन केले आहे, असे सुमन यांनी सांगितले. याशिवाय, कंगनाने तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली तर तुम्ही काय कराल, असे विचारण्यात आले असता, आम्ही तिला जशास तसे उत्तर देऊ, अशा निर्धार शेखर सुमन यांनी व्यक्त केला.
ते’ छायाचित्र फोटोशॉप केलेले; सुझान ह्रतिकच्या मदतीला! 

First Published on May 4, 2016 3:22 pm

Web Title: shekhar suman again hits out at kangana ranaut