News Flash

‘मला अनाथ आणि उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटते’, आईच्या निधानानंतर शेखर सुमनची पोस्ट

गुरुवारी, १७ जून रोजी शेखर सुमनच्या आईचे निधन झाले.

१६ जून रोजी शेखर सुमनने एक ट्वीट कर आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते

बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनच्या आईचे निधन झाले आहे. त्यांनी गुरुवारी, १७ जून रोजी अखेरचा श्वास घेतला. शेखर सुमनने ट्विटरद्वारे आईच्या निधनाची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्याने ‘मला अनाथ आणि उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे’ असे म्हटले आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

‘माझी आई, तिच्यावर माझे सर्वात जास्त प्रेम होते. ती आम्हाला सोडून गेली. मला अनाथ आणि उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे. तुम्ही सर्वांनी केलेल्या मदतीसाठी तुमचे आभार’ असे शेखर सुमनने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

१६ जून रोजी शेखर सुमनने एक ट्वीट कर आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते. ‘माझी आई लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे आभार’ असे शेखर सुमनने ट्वीट करत म्हटले होते.

त्याआधी त्याने आईचा फोटो शेअर करत प्रकृती खालावली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर चाहत्यांनी शेखर सुमनची आई लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. पण १७ जून रोजी शेखर सुमनच्या आईचे निधन झाले. अनेक कलाकारांसोबतच चाहत्यांनी देखील कमेंट करत शेखर सुमनच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 10:36 am

Web Title: shekhar suman feeling devastated and orphaned after his mother death avb 95
Next Stories
1 “भारताचा अभिमान”; मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्राने शोक व्यक्त केला
2 ‘मी हे स्विकारायलाच तयार नाहीये’; मिल्खा सिंग यांच्या निधनाने फरहान अख्तर भावूक
3 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने घेतली करोना लस
Just Now!
X