22 September 2019

News Flash

शर्लिन चोप्राने राम गोपाल वर्मावर केला ‘हा’ गंभीर आरोप

त्यांनी मला एका अडल्ट चित्रपटाची ऑफरही दिली आणि...

प्ले बॉयच्या मुखपृष्टावर नग्न छायाचित्र देण्याचं धाडस करुन चर्चेत आलेल्या शर्लिन चोप्राने चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. शर्लिनने कास्टिंग काउचसंदर्भात हे गंभीर आरोप केले असून राम गोपाल वर्मा यांनी अश्लील व्हिडीओ पाठविल्याचं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

“२०१६ मध्ये मी माझ्या काही फोटोंची एक प्रोफाइल राम गोपाल वर्मा यांना पाठविली होती. त्यासोबतच ते कोणता चित्रपट करत आहेत असं विचारुन त्यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यांचे ‘सत्या’, ‘कंपनी’ हे चित्रपट पाहिल्यानंतर मी त्यांची चाहती झाल्याचंही सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी मला एक स्क्रिप्ट पाठवली आणि या चित्रपटात काम करायला आवडेल की नाही ते कळव, असं त्यांनी सांगितलं. मात्र त्या स्क्रिप्टमध्ये केवळ सेक्स सीनविषयीच लिहिण्यात आलं होतं”.

पुढे ती म्हणते, “या स्क्रिप्टनंतर मला त्यांचा एक मेल आला. या मेलमध्ये चित्रपटाच्या कथेऐवजी एक अश्लील व्हिडीओ होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी त्यांना याप्रकरणी जाब विचारला. त्यावर जर तुझी संमती असेल तर आपण पुढे जाऊ शकतो असं त्यांनी मला सांगितलं. याचवेळी त्यांनी मला एका अडल्ट चित्रपटाची ऑफरही दिली”.

दरम्यान, शर्लिनने हा खुलासा तिच्या ‘कतार’ या गाण्याच्या प्रमोशनवेळी केला. शर्लिन सध्या कलाविश्वापासून दूर आहे. तिने २०१७ मध्ये माया या लघुपटात शेवटचं काम केलं होतं. २००२ मध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या शर्लिनने आतापर्यंत ‘बिग बॉस ३’ आणि ‘MTV Splitsvilla 6’ या टीव्ही शोमध्येही सहभाग घेतला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती. इतकंच नाही तर काही वर्षांपूर्वी IPL दरम्यान तिचं नाव वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलसोबत जोडलं गेलं होतं.

First Published on August 18, 2019 3:31 pm

Web Title: sherlyn chopra claims ram gopal varma sent her an adult film proposal and obscene video ssj 93