अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने प्रतिक्रिया दिली. बॉलिवूडमधील काही कलाकार ड्रग्ज घेऊन नैराश्येत जातात असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे.

अवश्य पाहा – “आरे कारशेड सर्व मुंबईकरांची समस्या नाही”; कंगना रणौतचा उद्धव ठाकरेंना टोला

“कंगना तू अगदी योग्य म्हणालीस. काही लोक अंमली पदार्थांचं सेवन करुन नैराश्येत गेल्याच्या घोषणा करतात. हे लोक देशातील तरुण पिढीसाठी आदर्श नाहीत. दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या मजुराला डिप्रेशन नसतं का? नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी ड्रग्जचं सेवन करावं का?” अशा आशयाचं ट्विट करुन शर्लिन चोप्राने बॉलिवूड कलाकारांना उपरोधिक टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – ऑनस्क्रीन ‘नागिन’चा बोल्ड अंदाज; पाहा मौनी रॉयचं हॉट फोटोशूट

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत.

जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.