“कोलकाता नाइट रायडर्सच्या पार्टीत ड्रग्सचं सेवन केलं जातं. या पार्ट्यांमध्ये स्टार्स व क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्सचं सेवन करतात, किंग खान कसा आहे हे सर्वांना माहित आहे,” असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री शर्लिन शोप्राने केला आहे. ड्रग्सचं सेवन करणाऱ्यांची नावं मी अमली पदार्थविरोधी पथकाकडे (एनसीबी) सोपवेन असंही ती म्हणाली. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला.

या मुलाखतीत शर्लिनने शाहरुख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि क्वान कंपनीच्या मालकावरही गंभीर आरोप केले. “मी केकेआरचा सामना पाहण्यासाठी कोलकाताला गेले होते. सामना झाल्यानंतर एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीत क्रिकेटर्स, बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्सचं सेवन करत असल्याचं मी स्वत: पाहिलं. क्रिकेटर्सच्या पत्नीसुद्धा ड्रग्सचं सेवन करतात”, असं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

#wakeup #saynotodrugs #getreal #healthiswealth #boycottbollywooddruggies

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

“दीपिकाला ‘माल’ न मिळाल्याने ती नैराश्यात गेली. क्वान कंपनीचा मालक हा अत्यंत वाईट माणूस आहे. त्याने माझ्याशी गैरवर्तणूक केली”, असे आरोप शर्लिनने या मुलाखतीत केले.

अभिनेत्रींना ‘एनसीबी’चे समन्स

एनसीबीने बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांना समन्स जरी करून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. दीपिकाला २५, तर श्रद्धा आणि सारा यांना २६ सप्टेंबरला हजर राहण्याबाबत कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी अमली पदार्थाचा संबंध आहे का? या मुद्दय़ासोबत हिंदी चित्रपटसृष्टी (बॉलीवूड) आणि अमली पदार्थ या समीकरणाबाबतही तपास सुरू आहे.