13 December 2017

News Flash

‘कामसूत्र थ्रीडी’मधून शर्लिन चोप्राची उचलबांगडी!

'प्लेबॉय'च्या मुखपृष्ठावर संपूर्ण नग्न छायाचित्र देण्याचे धाडस करून त्याविषयी ट्विट करून आपल्या चाहत्यांना? स्वत:हून

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 7, 2013 10:35 AM

‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर संपूर्ण नग्न छायाचित्र देण्याचे धाडस करून त्याविषयी ट्विट करून आपल्या चाहत्यांना? स्वत:हून त्याबाबतची माहिती देणारी ‘हॉट बेब’ शर्लिन चोप्रा आता ‘कामसूत्र थ्रीडी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र आता ‘होती’ असेच म्हणावे लागेल. कारण या चित्रपटासाठी तिच्यावर चित्रीत करण्यात आलेला अर्धनग्न व्हिडिओ निर्माता-दिग्दर्शकाच्या परवानगीशिवाय शर्लिननेच यूटय़ूबवर टाकल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शर्लिनऐवजी आता थेट हॉलिवूडच्या अभिनेत्रींचा विचार दिग्दर्शक रूपेश पॉल करतोय.
वात्सायनाच्या कामसूत्रांवर आधारित ‘कामसूत्र थ्रीडी’ बनविण्यात येत आहे. रूपेश पॉलच्या या चित्रपटात शर्लिन प्रमुख भूमिकेत असणार होती. परंतु, आता तिच्याऐवजी हॉलिवूड तारका मिला कुनीस किंवा ईव्हा लोंगोरिया यांना प्रमुख भूमिकेत घेण्याचा विचार रूपेश पॉल करीत आहे. आधी ‘प्लेबॉय’ या अमेरिकेतील नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर नग्न छायाचित्र दिल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शर्लिन चोप्राची ‘कामसूत्र थ्रीडी’मुळे अधिकच चर्चा झाली.
कामसूत्र थ्रीडी चित्रपटाची घोषणा कान महोत्सवात तर चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म बाजार’मध्ये जाहीर करण्यात आला होता. कामसूत्र हाच चित्रपटाचा विषय असल्यामुळे  स्वाभाविकपणे त्याविषयी प्रचंड कुतूहल प्रेक्षकांना आणि चित्रपटसृष्टीलाही आहे.
या चित्रपटाच्या कामाचा भाग म्हणून शर्लिनची छायाचित्रे (अर्थातच ‘कामसूत्र’ला साजेशीच!) काढण्यात आली होती. या छायाचित्रांचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ लोकांना पाहण्यासाठी तयार करण्यात आलेला नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. परंतु, तरीसुद्धा आपली परवानगी न घेता शर्लिनने हा व्हिडिओ यूटय़ूबवर अपलोड केला. यूटय़ूबवर हा व्हिडिओ पाहून आपण अचंबित झालो. परवानगीशिवाय अशा प्रकारे व्हिडिओ यूटय़ूबवर टाकणे चुकीचे आहे. म्हणूनच या चित्रपटात शर्लिन चोप्राऐवजी हॉलीवूड अभिनेत्री ईव्ही लोंगोरिया किंवा मिला कुनिस यांना घेण्याचा विचार सुरू आहे, असे दिग्दर्शक रूपेश पॉल यांनी स्पष्ट केले.

First Published on February 7, 2013 10:35 am

Web Title: sherlyn chopra out of kamasutra 3d