News Flash

‘ये दिल मांगे मोअर’, अंगावर रोमांच उभे करणारा कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्यावर आधारीत ‘शेरशाह’चा टीझर प्रदर्शित

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा सोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १२ ऑगस्टला प्रदर्शित होणार.

सिद्धार्थ या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट शेरशाहमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जागतिक पातळीवर प्रदर्शित होणार आहे. आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे.

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ कारगीलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारणार आहे. शेरशहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली असून १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात येत आहे. आपले ‘शेरशाह’ हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

आणखी वाचा : ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

विष्णू वर्धन यांचे दिग्दर्शन आणि धर्मा प्रोडक्शन्स व काश एंटरटेनेमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘शेरशाह’ हा बॉलीवूडचा या वर्षातील सर्वात मोठा युद्ध नाट्य चित्रपट असणार आहे. हा चित्रपट भारत आणि जगभरातील २४०+ देशांमध्ये १२ ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे.

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिका साकारणार आहेत. शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 3:16 pm

Web Title: shershaah teaser sidharth malhotra s war film to be released on 12th august dcp 98
Next Stories
1 वडिलांच्या कवितांचे रेकॉर्डिंग करत आहेत बिग बी; सोशल मीडियावर शेअर केला फोटो
2 ‘या’ कारणामुळे करिश्मा कपूरने ‘दिल तो पागल है’ सिनेमासाठी दिला होता नकार
3 “माझं काही बरं वाईट झालं, तर…”; जॅकी भगनानीवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीचा आणखी एक गौप्यस्फोट
Just Now!
X