20 September 2020

News Flash

शिबानी आणि फरहानची 365 दिवसांची सोबत, शेअर केला फोटो

२०१५ पासून ही जोडी एकमेकांना ओळखत आहे.

शिबानी-फरहान

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत येणारी जोडी म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर. गेल्या काही महिन्यांपासून ही जोडी आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे वारंवार चर्चेत आहे. शिबानी आणि फरहान अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. सध्या ही जोडी विदेश दौऱ्यावर असून या ट्रीपमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केले आहेत. मात्र यातील एक फोटो त्यांच्यासाठी खास असून त्यांच्या रिलेशनशीपला १ वर्ष पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे.

शिबानीने इन्स्टाग्रामवर फरहानसोबतचा एक फोटो शेअर केला असून या दोघही रोमॅण्टीक मूडमध्ये दिसून येत आहेत. या फोटोला शिबानीने ३६५ असं कॅप्शन दिलं आबे. सोबतच हार्टशेपच्या काही इमोजीही दिल्या आहेत. विशेष म्हणजे शिबानीप्रमाणेच अगदी सेम फोटो आणि कॅप्शन फरहानने दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

Three Six Five @faroutakhtar @abheetgidwani

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

या दोघांनी शेअर केलेल्या फोटोवरुन त्यांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे. वर्षामध्ये ३६५ दिवस असतात. त्यामुळे केवळ या अंकांचा वापर करुन त्यांनी आपल्या नात्यातील गोडवा जपत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Three six five @shibanidandekar Image: @abheetgidwani

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

गेल्या वर्षभरामध्ये या दोघांनीही अनेक वेळा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र अनेक वेळा त्यांच्या याच फोटोज किंवा व्हिडिओमुळे त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळही आली आहे.

दरम्यान, ही जोडी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहे. २०१५ पासून फरहान आणि शिबानी एकमेकांना ओळखतात. एका शोदरम्यान या दोघांमध्ये मैत्री झाली. फरहान होस्ट करत असलेल्या कार्यक्रमामध्ये शिबानीने भाग घेतला होता. येथेच त्यांची मैत्री झाली आणि शोनंतर या दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 10:39 am

Web Title: shibani dandekar and farhan akhtar redefine love in this pic
Next Stories
1 Video : प्रत्येकाला आपलासा वाटणारा ‘आम्ही बेफिकर’चा ट्रेलर प्रदर्शित
2 रणवीर सिंग आणि रणबीर कपूर एकत्र काम करणार ?
3 मोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका
Just Now!
X