News Flash

फरहानसोबतच्या नात्याविषयी शिबानीने अखेर सोडलं मौन

२०१६ मध्ये फरहानने त्याची पत्नी आणि प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट अधुना भबानी हिच्यासोबतचं वैवाहिक नातं संपवत घटस्फोट घेतला होता.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

एखाद्या कलाकारासोबत कोणा एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणं ही बाब बी- टाऊनमध्ये नवी नाही. मुळात सोशल मीडियामुळे या अशा चर्चांना बरंच उधाण येतं. सध्याच्या घडीला या चर्चांमध्ये प्रकाशझोतात असणारी नावं आहेत, शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरची. फरहान आणि शिबानी बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत असून, आता त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याचं म्हटलं जात आहे.

मुख्य म्हणजे खुद्द फरहाननेच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका सेल्फीतही त्याच्यासोबत शिबानी दिसत असल्यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. याविषयी जेव्हा शिबानीशी संपर्क साधण्यात आला तेव्हा तिने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शिबानीने फरहानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचंच ती म्हणाली. या सर्व चर्चांना कुठून तोंड फुटलं, हेच आपल्याला ठाऊक नसल्याचं ती म्हणाली.

फरहान सध्या लंडनमध्ये असून, तेथे तो सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबतही यापूर्वी फरहानं नाव जोडलं गेलं होतं. असंही म्हटलं जात आहे की, श्रद्धासोबतच्या ब्रेकअपनंतर आता फरहान आणि शिबानी एकमेकांसोबत जास्त वेळ व्यतीत करत आहेत. पण, या साऱ्याविषयी शिबानीचं मत मात्र काही वेगळं आहे हेसुद्धा नाकारता येणार नाही.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

दरम्यान, २०१६ मध्ये फरहानने त्याची पत्नी आणि प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट अधुना भबानी हिच्यासोबतचं वैवाहिक नातं संपवत घटस्फोट घेतला होता. ज्यानंतर त्याच्या आयुष्यात श्रद्धा कपूरची एंट्री झाल्याचं कळलं होतं. ‘रॉक ऑन २’ या चित्रपटादरम्यानच श्रद्धा आणि फरहानमधील जवळीक वाढल्याचं म्हटलं जात होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 10:04 am

Web Title: shibani dandekar reacts to rumours that she is dating bollywood actor farhan akhtar
Next Stories
1 VIDEO: कियाराचं नाव घेताच सिद्धार्थ म्हणाला…
2 VIDEO : अन् चाहतीच्या मदतीस धावला रणवीर
3 व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी चित्रपट अनुदानासाठी अपात्र ठरणार !
Just Now!
X