04 March 2021

News Flash

करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायूचा झटका, काही दिवसांपूर्वी झाला होता करोना

मॅनेजरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती..

काही दिवसांपूर्वी करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणारी अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिला करोनाची लागण झाली होती. आता गुरुवारी तिला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यानंतर शिखाला मुंबईमधील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी तिने करोनावर मात केली होती.

अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे शिखाच्या शरीराचा डावा भाग काम करत नसल्याचे म्हटले जात आहे. शिखाची मॅनेजर अश्विनी शुक्लाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शिखाच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. तिने शिखाचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिखाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

‘शिखाला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करोना व्हायरसवर मात केल्यानंतर एक महिन्याने, १० डिसेंबर रोजी शिखाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा’ असे अश्विनीने पोस्ट शेअर करत म्हटले आहे.

शिखाने वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये २०१४ मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे. मात्र, शिक्षणानंतर तिने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. तिने शाहरुख खानच्या ‘फॅन’, तापसी पन्नूच्या ‘रनिंग शादी डॉट कॉम’ आणि संजय मिश्रा यांच्या ‘कांचली’ या चित्रपटात काम केले आहे. परंतु, करोना काळात रुग्णांची सेवा करण्यासाठी ती पुन्हा एकदा तिच्या मूळ क्षेत्राकडे वळल्याचे पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 3:36 pm

Web Title: shikha malhotra hospitalised due to paralysis stroke avb 95
Next Stories
1 Video: सलमानने साजरा केला बॉडीगार्डचा वाढदिवस, पण…
2 येत्या दोन वर्षात रणवीर सिंग घेऊन येणार ७ नवे चित्रपट?
3 लग्नाची मागणी घालणाऱ्या चाहतीला टायगर श्रॉफचं विचारपूर्वक उत्तर
Just Now!
X