27 September 2020

News Flash

भाभीजी काँग्रेस मे है ! शिल्पा शिंदेचा राजकारणात प्रवेश

शिल्पा शिंदेने काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकारणात पाऊल ठेवलं आहे

भाभीजी घर पे है फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकारणात पाऊल ठेवलं आहे. शिल्पा शिंदेने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुटुंबाबाबत नकारात्मक कमेंट येत असल्याने ट्विटरला रामराम केल्याने शिल्पा शिंदे नुकतीच चर्चेत होती. शिल्पा शिंदे बिग बॉसच्या दहाव्या पर्वाची विजेती ठरली होती.

बिग बॉस जिंकल्यानंतर शिल्पा शिंदे सुनील ग्रोव्हरच्या क्रिकेटवर आधारित वेब सीरिज ‘जिओ धन धना धन’ मध्ये झळकली होती. सुनीलची पत्नी गुगली देवीची भूमिका तिने निभावली होती. एका मराठी कार्यक्रमात लावणी डान्स करतानाही ती दिसणार आहे.

शिल्पा शिंदेने टीव्ही शो ‘भाभीजी घर पे है’ मधून छोट्या पदड्यावर पदार्पण केलं होतं. अल्पावधीत तिचं अंगुरी भाभी पात्र लोकांच्या घराघरात पोहोचलं होतं. पण याच टीव्ही शोवरुन झालेल्या वादामुळे शिल्पा शिंदे चर्चेत आली होती. प्रकृतीचं कारण देत शिल्पा शिंदेने शोमधून एक्झिट घेतली होती. कराराचं उल्लंघन केल्याने तिच्यात आणि निर्मात्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. प्रोडक्शन टीमचे लोक सारखे त्रास देतात. काहीजण करिअर संपवण्याची धमकी देतात असा आरोप शिल्पा शिंदेने केला होता.

यानंतर निर्माता बिनफेर कोहली यांनी सिन्टामध्ये शिल्पा शिंदेविरोधात तक्रार केली होती. यानंतर सिन्टाने नॉन कॉर्पोरेशन सर्क्यूलर काढण्याचा निर्णय घेतला होता ज्यामुळे शिल्पा भविष्यात कोणत्याही चॅनेल किंवा निर्मात्यांसोबत काम करु शकत नसल्याचा उल्लेख होता.

शिल्पा शिंदेचा जन्म 28 ऑगस्ट 1977 रोजी झाला आहे. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय घरात तिचा जन्म झाला. तिचे वडील डॉ सत्यदेव शिंदे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. शिल्पाच्या वडिलांना तिने कायद्याचं शिक्षण घ्यावं अशी इच्छा होती. पण शिल्पा शिंदेला अभिनेत्री व्हायचं होतं. त्यांनी शिल्पाला एक वर्ष दिलं होतं आणि तिनेही संधीचं सोनं करत यशस्वी अभिनेत्री झाली. 2013 रोजी तिच्या वडिलांचं निधन झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 4:34 pm

Web Title: shila shinde joins congress
Next Stories
1 परीक्षेचा ताण दूर करू पाहणारा चित्रपट ‘१० वी’
2 सलमान खानमुळे मलायकाचा ‘दबंग ३’मधून पत्ता कट?
3 अक्षय कुमारसोबत काम करणं अशक्य – शाहरुख खान
Just Now!
X