26 September 2020

News Flash

अश्विनी एकबोटे यांच्या ‘एक्झिट’मुळे शिल्पा नवलकरची ‘एण्ट्री’

ते बोट लागताक्षणीच माझ्याही नकळत माझे डोळे भरून वाहायला लागले.

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या दुहेरी या मालिकेत एक चांगलाच ट्विस्ट येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या दुहेरी या मालिकेत एक चांगलाच ट्विस्ट येणार आहे. दुहेरीचा नायक दुष्यंत याच्या भूतकाळातलं एक मोठं सत्य बाहेर येणार आहे. दुष्यंत या व्यक्तिरेखेची आत्या हीच त्याची खरी आई असल्याचं सत्य बाहेर येणार आहे. त्यामुळे त्याच्या आत्याची भूमिका करण्यासाठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची निवड करण्यात आली होती. काही भागांचं शूटिंगही करण्यात आलं होतं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अश्विनी एकबोटेंच्या अकाली निधनामुळे त्यांची भूमिका आता शिल्पा नवलकर करणार आहेत. या भूमिकेविषयी आपला अनुभव शेअर करताना शिल्पा नवलकर म्हणाल्या की, ‘हा रोल जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्या रोलवर अश्विनीची छाप होती. ती माझी खूप जुनी मैत्रीण होती. त्यामुळे तिला श्रद्धांजली देण्यासाठी मी हा रोल स्वीकारला. पण, माझ्या मनात कोणतीही तुलना आली नाही. कारण, मी आणि संपूर्ण टीमने हे मनातून काढून टाकलं होतं की हा रोल पूर्वी एक वेगळी अभिनेत्री करत होती. त्यामुळे संपूर्ण पाटी कोरी करून आम्ही नव्याने या भूमिकेला सुरुवात केली.

मन घट्ट करून मी या भूमिकेसाठी मेकअपला बसले. मेकअप दादांनी मेकअपची सुरुवात करताना लावतात तसं बेसचं एक बोट माझ्या कपाळावर लावलं. ते बोट लागताक्षणीच माझ्याही नकळत माझे डोळे भरून वाहायला लागले. त्यामुळे मेकअप दादांना मी थोडा वेळ थांबायला सांगितलं. अश्विनीची त्यावेळी मला खूप आठवण आली. एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही.’

मैथिली आणि नेहा या दोन बहिणींची कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे. दोघी बहिणींच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे नाटय़ मालिकेत सादर करण्यात आले आहे.  एका बहिणीसाठी दुस-या बहिणीने आपली बदललेली ओळख  अशी ही कधीही न पाहिलेली दोन बहिणींची थरारक कथा, संजय जाधव यांचे दिग्दर्शन, निवेदिता सराफ, तुषार दळवी, सुनील तावडे आदी कलाकारांचा सहभाग या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांना या मालिकेत गुंतवून ठेवण्यात दुहेरीच्या संपूर्ण टीमला यश मिळालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 3:34 pm

Web Title: shilpa navalkar will be seen as dushyants mother in duheri
Next Stories
1 सलमान-अहिलची ‘सॉलिड टीम’..
2 VIDEO: शाहरुखच्या लेकीचा हा स्टेज परफॉर्मन्स पाहिलात का?
3 ‘द सेकंड सेक्स’ म्हणजे स्त्रीवादाचं बायबल- वीणा जामकर
Just Now!
X