अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहिण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्यावर कर्ज बुडवल्याचा आरोप एका व्यावसायिकानं केला आहे. शिल्पा शेट्टीच्या वडिलांनी आपल्याकडून व्यवसायासाठी २१ लाखांचं कर्ज घेतलं होतं. २०१७ पर्यंत  व्याजासकट कर्जाची परतफेड होणं अपेक्षित होतं मात्र वर्ष उलटलं तरीही सुरेंद्र शेट्टी यांच्याकडून कर्जफेड झालेली नाही असा आरोप या व्यावसायिकाचा आहे. शिल्पा शेट्टी हिच्या वडिलांचं निधन झालंय त्यामुळे हे कर्ज तिघींनी लवकरात लवकर फेडावं अशी मागणी त्यानं केली आहे. दरम्यान शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.

सुरेंद्र शेट्टी यांच्याशी आपले घनिष्ठ संबध होते. २०१५ मध्ये त्यांनी आपल्याकडून २१ लाख रुपये व्यवसायासाठी कर्ज म्हणून घेतले हो.ते ज्याची २०१७ मध्ये परतफेड होणं अपेक्षित होतं असं व्यावसायिक परहद आमरा यांचं म्हणणं आहे. मात्र शेट्टी कुटुबींयांनी कर्ज फेडायला नकार दिल्याचा परहदचा आरोप आहे. २१ लाख रुपये शेट्टी कुटुबींयांनी बुडवले असल्याची तक्रार परहदनं दाखल केली आहे.

वडिलांनी अशाप्रकारचं कोणतंही कर्ज घेतलं नव्हत, परहद दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं शिल्पाचं म्हणणं आहे आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे.