News Flash

शिल्पा शेट्टी जपानमध्ये ‘बाजीगर’मधील गाण्यावर करतेय डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल…

शिल्पा शेट्टीने दिला जुन्या आठवणींना उजाळा

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते. यावेळी शिल्पा ‘ऐ मेरे हमसफर ऐ मेरी जाने जा’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. ती या गाण्यावर जपानमध्ये डान्स करताना दिसत आहे.

अवश्य पाहा – विमानात सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

शिल्पा शेट्टी सध्या जपानमध्ये आहे. तिने जपानमधील क्योटो शहरातील रस्त्यावर हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘बाजीगर’ या चित्रपटातील ‘ऐ मेरे हमसफर ऐ मेरी जाने जा’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी शिल्पाचे हे नृत्य पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षावर केला आहे.

अवश्य पाहा – पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांच काय झालं?; बॉलिवूड संगीतकाराचा केंद्र सरकारला सवाल

 

View this post on Instagram

 

#Reeling with nostalgia in Kyoto, Japan #ReelItFeelIt #ReelKaroFeelKaro

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

‘बाजीगर’ हा शिल्पा शेट्टीच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. तिने या चित्रपटात फारशी मोठी भूमिका साकारली नव्हती. तरीही यामधील अभिनयासाठी तिचे प्रचंड कौतुक केले जाते. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानने खलनायकाची भूमिका साकारली होती. ‘ऐ मेरे हमसफर ऐ मेरी जाने जा’ हे गाणं त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं. शिल्पाच्या या व्हिडीओमुळे हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 2:07 pm

Web Title: shilpa shetty baazigar ae mere humsafar viral video mppg 94
Next Stories
1 “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा
2 बिहारनंतर मुंबईमधील रस्त्याला सुशांतचे नाव देण्याची मागणी
3 …म्हणून माधुरीने शेअर केलेल्या फोटोची होत आहे चर्चा
Just Now!
X