News Flash

Video : नजर हटी, दुर्घटना घटी; घरकाम करणारीला किस केल्याने शिल्पा शेट्टीने केली पतीची धुलाई

शिल्पा शेट्टीच्या या व्हिडीओला काही तासांतच १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बॉलिवूडमध्ये सर्वांत चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा. लॉकडाउनमध्ये शिल्पा पती व मुलासोबत मजेशीर व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिल्पा-राजच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनही भरभरून लाइक्स मिळत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ शिल्पाने नुकताच पोस्ट केला आहे. ‘नजर हटी, दुर्घटना घटी, सच्चाई पता चलने पर पिट गए हमारे पती’, असं कॅप्शन देत शिल्पाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिल्याप्रमाणेच शिल्पाने व्हिडीओअखेर राजची धुलाई केली आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला शिल्पा तिच्या वॉर्डरोबमधील कपडे नीट लावताना दिसते. तेव्हा पती राज तिला किस करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर शिल्पा म्हणते, ‘काम करताना मला किस करण्याचा प्रयत्न करू नकोस.’ हे ऐकून घरकाम करणारी महिलासुद्धा शिल्पाला सांगते, ‘मीसुद्धा सांगितलं, पण माझं ऐकतच नाहीत.’ यानंतर शिल्पा पतीची चांगलीच धुलाई करते.

शिल्पा शेट्टीच्या या व्हिडीओला काही तासांतच १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. बऱ्याच कलाकारांनीही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. शिल्पाची बहीण शमिता शेट्टीने हसण्याचे इमोजी कमेंट्समध्ये पोस्ट केले आहेत. तर अभिनेता रोहित रॉयने राजच्या अभिनयाचं कौतुक केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 1:49 pm

Web Title: shilpa shetty beats up husband raj kundra as house help accuses him of kissing her watch video ssv 92
Next Stories
1 व्हायरसवर आधारित ‘कंटेजन’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याच्या मुलीला करोनाची लागण
2 “नटून-थटून टीव्हीवर येण्यापूर्वी मजुरांचे हाल पाहा”; दिग्दर्शकाचा मोदी सरकारला टोला
3 दिवाळीतील फटाके फोडताना भाजला होता अमिताभ बच्चन यांचा हात
Just Now!
X