25 February 2021

News Flash

जॅकलिनच्या हॉट फोटोवर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…

सध्या जॅकलिनचे हे फोटो चर्चेत आहेत..

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. जॅकलिन चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नुकताच जॅकलिनने सोशल मीडियावर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेत असून अभिनेत्री शिल्पा शेट्टीने त्यावर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे हॉट फोटो शेअर केले आहेत. बॅलेरिना स्टाइलमध्ये हे फोटो शूट केले असून ती पायाच्या बोटांवर शरीराचा तोल सांभाळताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर जॅकलिनचे हे हॉट फोटो चर्चेत आहेत.

जॅकलिनच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. पण शिल्पा शेट्टीने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिल्पाने ‘जॅकलिन खूप मस्त’ असे म्हणत तिचे कौतुक केले आहे. तसेच अभिनेत्री यामी गौतमीने देखील कमेंट करत जॅकलिनचे कौतुक केले आहे.

पाहा फोटो >> जॅकलीनची अजब पोझ; अंगठ्यावर तोल सांभाळत केलं हॉट फोटोशूट

जॅकलिन लवकरच ‘किक २’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘भूत पोलीस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. लॉकडाउनच्या काळात ती अभिनेता सलमान खानसोबत त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर वेळ घालवत होती. त्यावेळी तिचे आणि सलमानचे गाणे प्रदर्शित झाले होते. त्यावेळी तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 4:54 pm

Web Title: shilpa shetty commented on jacqueline fernandez hot photos avb 95
Next Stories
1 ‘आजारपणात घेतोय माझी काळजी’; बॉयफ्रेंड आदित्यसाठी रसिका सुनीलची खास पोस्ट
2 पोपटलालने केलं लग्न? नववधूच्या स्वागतासाठी गोकुळधामवासी सज्ज
3 मिताली-सुयशच्या प्रेमाला बहर; काय आहे त्यांचं ‘हॅशटॅग प्रेम’?
Just Now!
X