बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या डान्स आणि फिटनेससाठी विशेष ओळखली जाते. ती सतत सोशल मीडियावर तिचे योग करताचे तसेच डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. पण सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा सासूबाईंसोबत डान्स करतनाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शिल्पा आणि तिच्या सासूबाई गूड न्यूज या चित्रपटातील गाणे ‘सौदा खरा खरा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच शिल्पाचा मुलगा वरुण देखील मस्ती करताना दिसत आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राने हा व्हिडीओ शूट केला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच संपूर्ण कुटुंबीय शिल्पाच्या सासूबाईंचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करत ‘जगातील सर्वात बेस्ट सासूबाई. त्यांचा आज वाढदिवस. तुम्ही आमच्यासाठी एक रॉकस्टार आहात. तुमचा आशिर्वाद कायम आमच्यासोबत असतो. मी खरज स्वत:ला खूप भाग्यवान समजते’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.