29 September 2020

News Flash

शिल्पाची लेक झाली ३ महिन्यांची; शेअर केला ‘हा’ सुंदर फोटो

१५ फ्रेबुवारी रोजी समिषाचा जन्म झाला

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कलाविश्वातील ‘फिट गर्ल’ म्हणून ओळखलं जातं. शिल्पा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा फिटनेस फंडा सांगत असते. यात बरोबरच ती अनेकदा योग करतानाचे किंवा कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते. अलिकडेच शिल्पाने तिच्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करुन तिने समिषा तीन महिन्यांची झाली असं सांगितलं आहे.

१५ फ्रेबुवारी रोजी शिल्पा दुसऱ्यांदा आई झाली. तिने सरोगसीद्वारे एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचं नाव समिषा असं असून ती तीन महिन्यांची झाली आहे. त्यामुळेच शिल्पाने तिच्यासोबतचा एक छान फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिच्यासोबत मुलगा वियानदेखील दिसून येत आहे. “तीन महिने झाले अभिनंदन. माझी राजकुमारी समिषा”, असं कॅप्शन शिल्पाने या फोटोला दिला. सध्या नेटकऱ्यांमध्ये या फोटोची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, समिषाचा जन्म १५ तारखेला झाला असून १५ हा आकडा शिल्पासाठी खास असल्याचं तिने अलिकडेच सांगितलं होतं.“१५ नंबर माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण १५ फेब्रुवारीला माझ्या मुलीचा जन्म झाला. १५ एप्रिलला ती दोन महिन्यांची झाली आणि त्याच दिवशी माझे टिक-टॉकवर १५ मिलियन फॉलोअर झाले आहेत, असं शिल्पा म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 12:43 pm

Web Title: shilpa shetty daughter samisha is 3 months old a cute picture on social media ssj 93
Next Stories
1 अभिनेता शोएब इब्राहिमला चाहत्याने विचारला पत्नीच्या कपड्यांवरुन प्रश्न, रागात म्हणाला…
2 ‘आपण कोणत्या देशात राहतो?’ करण जोहरच्या प्रश्नावर मुलाने दिलं ‘हे’ मजेशीर उत्तर
3 फोटोमधील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? आज आहे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री
Just Now!
X