बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. अनेकदा ती व्हिडीओज् आणि फोटोच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या शिल्पा तिच्या कुटुंबीयांसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत असून तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये शिल्पाची लेक समिशा पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आली आहे.
शिल्पा अनेकदा तिच्या कुटुंबीयांसोबतचे काही व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेला व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण, या व्हिडीओमध्ये शिल्पाची लेक समिशा दिसत असून तिच्या बाललीलादेखील पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा पती राज कुंद्रा गाणं म्हणताना दिसत आहेत. मात्र, राजचा आवाज समिशाला फारसा काही रुचला नाही. त्यामुळे राजने गाणं म्हणायला सुरुवात केली की समिशा जोरजोरात ओरडताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने एक हटके कॅप्शन दिलं आहे. “चिंता कमी करा आणि गाणं म्हणा.. समिशा म्हणते, तुम्ही गाणं गुणगुणनं बंद केलं पाहिजे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”, असं कॅप्शन शिल्पाने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, शिल्पा सध्या तिच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत असून लवकरच ती ‘निकम्मा’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत अभिमन्यू दसानी स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच ती ‘हंगामा 2’ मध्येही झळकणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 1, 2021 5:15 pm