20 November 2017

News Flash

‘ट्रोल’मुळे शिल्पाकडून तो व्हिडिओ डिलीट

प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या अत्याच्यारावरून युझर्सनी शिल्पाला खडेबोल सुनावले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 11:19 AM

शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांसोबत खासगी आणि व्यावसायिक आयुष्याची माहिती सतत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी शिल्पा मुलगा वियानसोबत दुबईच्या ट्रिपला गेली होती. तिथले अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केले. या फोटोंना लाखो लाइक्सही आले. पण या व्हिडिओंमध्ये एक व्हिडिओ असा होता ज्यावर अनेकांची नजर गेली.

सचिन खेडेकरांच्या ‘बापजन्म’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

माय-लेकांच्या या जोडीने दुबईत एका प्राणी संग्रहालयाला भेट दिली होती. यावेळी शिल्पाने चिंपाजीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तिने चिंपाजीचे नाव ‘प्रिन्सेस’ असे ठेवले होते. या व्हिडिओमध्ये तो चिंपांजी शिल्पाकडे पाहून हसताना, तिला किस करताना स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ शिल्पाच्या चाहत्यांना फारसा आवडला नाही. या व्हिडिओमध्ये चिंपाजी शिल्पाबरोबर हसत होता किंवा तिला किस करत होता ते प्रशिक्षकाच्या सांगण्यावरुन. चिंपाजींकडून सर्व गोष्टी जबरदस्तीने करून घेतल्या जात होत्या.

शिल्पाच्या या व्हिडीओला अशा काही उलट-सुलट प्रतिक्रिया मिळाल्या ज्याची शिल्पानेही कधी अपेक्षा केली नसेल. प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या अत्याच्यारावरून युझर्सनी शिल्पाला खडेबोल सुनावले. तिच्या व्हिडिओचे समर्थन करणारी एकही कमेन्ट न आल्यामुळे पर्यायाने शिल्पाला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, ‘हा माझा सर्वात आवडता व्हिडिओ आहे. मला प्रिन्सेसची फार आठवण येतेय.’

‘चिंपाजीसोबतचे ते वागणे फारच दुःखद आहे. लोकांसाठी जरी हे मनोरंजन असले तरी त्यांच्यावर केले जाणारे अत्याचार याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. प्राण्यांना प्रेमाची गरज असते. अत्याचाराची नाही,’ अशी कमेन्ट एका युझरने केली होती. अशा कमेन्टमुळे शिल्पाने तो व्हिडिओ डिलीट करण्याचा निर्णय घेतला.

First Published on September 13, 2017 11:19 am

Web Title: shilpa shetty deletes videos of her and son with exotic animals after backlash