देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट खूप भयावह आहे. या संकटात देश कोरोनाशी दोन हात करत लढा देतोय. ठिकठिकाणाहून करोनाची भयावह चित्र समोर येत आहेत. कधी स्मशानभूमीतले तर कधी रूग्णालयात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून तळमळत असलेल्या रूग्णांचे तर ऑक्सिजन मिळत नाही म्हणून रूग्णांचे जीव गेल्याच्या घटना तर ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. ही सर्व परिस्थीती पाहून सोनू सुद, सलमान खान पाठोपाठ आता बॉलिवूडची फिट अँड फाईन अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही मदतीसाठी पुढे सरसावलीय. एक व्हिडीओ शेअर करत असताना शिल्पा शेट्टी रडू आवरलं नाही.

करोना काळातली भयावह परिस्थीती, कोणी आपल्या आईला गमवतंय, तर कुणी आपल्या मुला-मुलींना…लोकांनी काय करायला हवं हे व्हीडीओमध्ये सांगत असताना शिल्पा शेट्टीचे डोळे अश्रूंनी डबडबले. आपल्या अश्रुंना आवरत तिने हा व्हिडीओ पुर्ण केला आणि या कठीण काळात एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं. चार मिनीटाच्या या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टीने फ्रंटलाईन वर्कर्सचे देखील आभार मानले. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी लोकांना सकारात्मक करताना दिसून आली.

” करोना काळात देशात सध्या जी परिस्थीती सुरू आहे, त्यावर बोलण्यासाठी मी आलेय…मी अजिबात ठिक नाही, मीच काय…तर आपण सर्व जण सुरक्षित नाहीत..आपल्या आजुबाजुला हतबल करणारी जी परिस्थीती सुरूय त्यातून आपण सर्व जण जातोय..हे सगळं पाहून मी खूप विचलीत होतेय…सगळ्यात विचलीत करणारं म्हणजे…मृत्यू झाल्यानंतर आपल्या माणसांचं अंत्यसंस्कारही करू शकत नाही”, हे बोलत असताना शिल्पा शेट्टी रडू कोसळलं.

पुढे बोलताना ती म्हणाली, ” सध्या लोक करोनापेक्षा जास्त खायला अन्न नसल्यानं भुकेमुळे लोकाचा मृत्यू होतोय…ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवट्यासोबतच जेवणासाठी देखील लोक त्रस्त आहेत… म्हणूनच मी ‘खाना चाहिए’ या मोहिमेसोबत मी जोडली गेलीये…आणि लोकांनी ही शक्य तितकी मदत करावी “, असं आवाहन तिनं केलंय.

‘खाना चाहिए’ ही संस्था गरजवंत आणि गरीब लोकांसाठी जेवण देण्याचं काम करते. करोना काळात गरीबांना मदत करण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी या मोहिमेशी जोडली आहे.