News Flash

शिल्पा शेट्टीच्या पतीचा ‘जोकर’ अवतार; म्हणाला, “मी वेगळा असल्याने ते….

जोकर या हॉलिवूडपटातल्या लूकमधला व्हिडिओ केला शेअर

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह असतो. शिल्पाही त्याच्यासोबतचे विनोदी व्हिडिओ, फोटो पोस्ट करत असते. राजचा एक वेगळा चाहता वर्गही निर्माण झाला आहे. त्याने नुकताच एका भन्नाट लूकमधला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट ‘जोकर’ यातल्या मुख्य पात्राच्या लूकमध्ये दिसत आहे.

राज कुंद्राने एका ऍपच्या माध्यमातून आपला चेहरा ‘जोकर’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या जोक्विन फिनिक्स याच्या शरीरावर पेस्ट करून एक व्हिडिओ तयार केला आहे. हा फेक व्हिडिओ ‘जोकर’ चित्रपटातल्या एका सीनचा आहे, ज्यात राजने जोकरची जागा घेतलेली दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

या व्हिडिओला त्याने भन्नाट कॅप्शनही दिलं आहे. यात तो म्हणतो, “ते माझ्यावर हसतात कारण मी वेगळा आहे आणि मी त्यांच्यावर हसतो कारण ते सगळे सारखेच आहेत.”

राज आपले असे वेगवेगळ्या लूकमधले फेक व्हिडिओज कायम शेअर करत असतो. त्याने यापूर्वी ‘फ्लाईंग जट’, ‘ऍक्वामॅन’, ‘द ऍव्हेंजर्स’, ‘गोलियों की रासलीलाः रामलीला’ अशा अनेक चित्रपटांमधल्या सीन्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्याने शिल्पाचाही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या वेबसीरीजमधला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे राजच्या व्यक्तिमत्वातली ही मनोरंजक बाजू शिल्पाच्या टिकटॉक व्हिडिओंच्या माध्यमातून समोर आली. शिल्पा राज आणि तिच्या मुलासोबत सतत काहीतरी व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचं मनोरंजन करत असते. तिच्या या व्हिडिओंना चाहत्यांचीही भरपूर पसंती मिळते. सोशल मीडियावरही हे व्हिडिओ भरपूर व्हायरल होत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:05 pm

Web Title: shilpa shetty husband raj kundra shared a video in joker look vsk 98
Next Stories
1 सलमानच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी, लॉकडाऊनमुळे ‘राधे’चे प्रदर्शन लांबणीवर
2 Birthday Special: पहिल्या नजरेत प्रेम, अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची लव्हस्टोरी
3 स्वदेशीचा जागर करणाऱ्या कंगनाला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले,..
Just Now!
X