सध्या सोशल मीडियावर अनेक कलाकार सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेटी. ती सोशल मीडियावर मुलगी समिषासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच शिल्पाने शेअर केलेल्या टिक-टॉक व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या शिल्पाच्या टिक-टॉक व्हिडीओमध्ये तिचा पती राज कुंद्रा देखील असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये शिल्पा मराठी चित्रपट ‘धूरळा’ मधील अभिनेत्री ताम्हणकरचा डायलॉग थोड्या वेगळ्या अंदाजात राजला ऐकवताना दिसते. तिचा हा अंदाज तुम्हाला खळखळून हसवणारा आहे.
@theshilpashettyMere gaane pe itna “gira hua” reaction diya @therajkundra ne ##patipatni ##comedy ##marathimuser ##funny ##tiktok
शिल्पाचे १५ एप्रिल रोजी टिक-टॉकवर १५ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. याची माहिती देण्यासाठी तिने मुलगी समिषासोबतचा हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओ मध्ये “१५ नंबर माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. माहित आहे का? कारण १५ फेब्रुवारीला माझी मुलगी समिषाचा जन्म झाला. १५ एप्रिलला ती दोन महिन्यांची झाली आणि १५ एप्रिलला टिक-टॉकवर माझे १५ मिलियन फॉलोअर झाले आहेत. तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद” असे शिल्पा म्हणाली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 2:33 pm