15 August 2020

News Flash

शिल्पा शेट्टीने ५० दिवसांत कमावले १ कोटी; वाचा कसं?

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत शिल्पाने त्यामागिल गुपित सांगितले आहे.

आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा ही केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर सोशल मीडियावर देखील तितकीच लोकप्रिय आहे. ती सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. शिल्पाचे टिक-टॉकवर ५० दिवसांमध्ये १ कोटी फॉलोअर्स झाले आहेत. फॉलोअर्सच्या संख्येत कशी वाढ झाली याची माहिती खुद्द शिल्पाने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ‘कोणी ५० दिवसांमध्ये १ कोटी कमवू शकतं का? हा मी कमावले आहेत. आणि हे मी एकटीने केलेले काम नाही. तुम्ही आणि मी मिळून हे एक कोटी झाले आहेत. आपले १ कोटींचे टिक-टॉक कुटुंब झाले आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हेत’ असे शिल्पा व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

अशा प्रकारे शिल्पाने टिक-टॉकवर एक कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. ५० दिवसांपूर्वी शिल्पाने टिक-टॉक व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. तिचे व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. आता तिने १ कोटी फॉलोअर्सची संख्या देखील पार केली आहे. शिल्पा लवकरच ‘निकम्मा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्यानंतर ती परेश रावलच्या ‘हंगामा’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ही दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:00 pm

Web Title: shilpa shetty makes 10 million in 50 days video viral avb 95
Next Stories
1 कोणाची रात्र सजवून अभिनेत्री झाले नाही – तनुश्री दत्ता
2 चिमुरडीचा ‘संभाजींना’ घरी येण्याचा आग्रह; डॉ. अमोल कोल्हे भावूक
3 ‘कांटा लगा’ फेम शेफाली जरीवाल होणार आई?
Just Now!
X