बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सतत सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकातात तिने मुलगी समिषासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने तिच्या आयुष्यात १५ या नंबरचे किती महत्त्व आहे हे देखील सांगितले आहे.

नुकताच शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मुलगी समिषाला घेतले असून ती तिच्या आयुष्यातील १५ नंबरचे महत्त्व सांगताना दिसत आहे. “१५ नंबर माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. माहित आहे का? कारण १५ फेब्रुवारीला माझी मुलगी समिषाचा जन्म झाला. १५ एप्रिलला ती दोन महिन्यांची झाली आणि १५ एप्रिलला टिक-टॉकवर माझे १५ मिलियन फॉलोअर झाले आहेत. तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद” असे शिल्पा म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

Some things in life are a little more special than the others. The number ‘15’ has been added to that list now! Our daughter, Samisha Shetty Kundra, came into our lives on 15th Feb and she turns two months old today on 15th April. It’s also a very special and happy coincidence that we have become a family of 15 MILLION on @indiatiktok today, on the 15th of April So grateful for all the love & blessings that you have showered on my family and me over the years… humbled beyond words. Hope you continue to stand by us, rock solid, even in the years to come ~ @rajkundra9 . . . . . #20DaysOfGratefulness #Day19 #SamishaShettyKundra #happiness #gratitude #blessed #grateful #daughter #15Million #TikTokIndia

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

पाहा : शिल्पा शेट्टीच्या मुलीला पाहिलंत का? पहिल्यांदाच दिसली सार्वजनिक ठिकाणी

१५ फेब्रुवारी रोजी शिल्पाला सरोगजीद्वारे मुलगी झाली होती. तिने तिचे नाव समिषा ठेवले. शिल्पाने सरोगसीद्वारे मुलगी झाल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. खर तर शिल्पा दुसऱ्यांदा आई झाली आहे. २०१२ साली तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. तिच्या पहिल्या मुलाचे नाव विहान असे आहे.