News Flash

‘माझा नवरा पर्फेक्ट आहे पण…’, शिल्पाने केला खुलासा

'सुपर डान्सर ४'मध्ये शिल्पाने हा खुलासा केला आहे.

'सुपर डान्सर ४'मध्ये शिल्पाने हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या ‘सुपर डान्सर ४’ या डान्स रिअॅलिटी शोची परीक्षक आहे. या आठवड्याला ‘सुपर डान्सर ४’मध्ये लोकप्रिय गायक कुमार सानू हजेरी लावणार आहेत. यावेळी कुमार सानू यांच्या लोकप्रिय गाण्यांवर स्पर्धक डान्स करणार आहेत. त्याचा प्रोमो हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी शिल्पाने पती राज कुंद्रा विषयी एक खुलासा केला आहे.

‘सुपर डान्सर ४’ चा प्रोमो सोनी टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये विश बाउलचा खेळ असणार आहे. या बाउलमध्ये सुपर डान्सर मध्ये असलेल्या प्रत्येकाची एक इच्छा आहे. यावेळी शिल्पाने कुमार सानू यांच्याकडे एक खास मागणी केली. शिल्पाने कुमार सानू यांना ‘कभी हाँ कभी ना’ या चित्रपटातील ‘वो तो है अलबेला’ हे गाणं गाण्याची विनंती केली. हे गाणं शिल्पाचा पती राज कुंद्राला आवडतं असल्याचे शिल्पाने सांगितले.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

या गाण्याविषयी सांगताना शिल्पा पुढे म्हणाली, “राजमध्ये सगळे गुणं आहेत, पण त्याला गाता येत नाही. माझ्या पतीने जेव्हा हे गाणं म्हणायला सुरुवात केली. तेव्हा मला कळले की गाणं गायचं त्याचं काम नाही! त्यामुळे तुम्ही आता हे गाणं गायल्या नंतर त्याला कळेल की नक्की हे गाणं कसें गायला हवे.”

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

शिल्पा आणि राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक विनोदी व्हिडीओ शेअर करताना दिसतात. शिल्पा आणि राजने २००९ मध्ये लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विवान त्यांच्या मुलाचे नाव आहे तर समीक्षा त्यांच्या मुलीचे नाव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:07 pm

Web Title: shilpa shetty says her husband is perfect but raj kundra can not sing dcp 98
Next Stories
1 Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला लग्नासाठी १० दिवसांचा जामीन मंजूर
2 नीति मोहनने शेअर केली मुलगा आर्यवीरची पहिली झलक; क्यूट फोटो पाहून अनुष्का शर्मा म्हणाली…
3 ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
Just Now!
X