04 December 2020

News Flash

शिल्पा शेट्टी म्हणते, “या एकाच अटीवर मी सुनेला माझी २० कॅरेट डायमंडची अंगठी देईन”

दागिने आणि स्त्रिया याचं नातं म्हणजे कधीही न तुटणारं.

दागिने आणि स्त्रिया याचं नातं म्हणजे कधीही न तुटणारं. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांची दागिन्यांची आपली एक वेगळी अशी आवड असते. अभिनेत्री शिल्पा शेट्टीला डायमंडचे दागिने फार आवडतात आणि त्याचं आकर्षक कलेक्शनसुद्धा तिच्याकडे आहे. तिच्याकडे असलेलं २० कॅरेटचं डायमंड ती भविष्यात होणाऱ्या सुनेला देण्यास तयार आहे. मात्र त्यासाठी तिची एक अट आहे.

“मी नेहमीच माझ्या मुलाला म्हणते, की जर तुझी बायको माझ्याशी नीट वागली तरच मी तिला माझं २० कॅरेटचं डायमंड देईन”, असं तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

आणखी वाचा : प्रेक्षकांची निराशा करणारी ‘लक्ष्मी’

शिल्पाची दागिन्यांची आवड लक्षात ठेवून राज कुंद्राने तिला प्रपोज करताना डायमंडची रिंग दिली होती. याबद्दलचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. “११ वर्षांपूर्वी तू मला प्रपोज केलं होतंस. मला अजूनही आठवतंय की त्यासाठी तू पॅरिसमधल्या हॉटेलमधील बँक्वेट हॉलच बुक केला होतास. हे प्रत्येक मुलीच्या स्वप्नातलं प्रपोजल असतं. तेव्हापासून तू माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं आहेस. पाच कॅरेटचं डायमंड रिंग देऊन तू मला प्रपोज केलं होतंस”, असं तिने त्या व्हिडीओत सांगितलं होतं.

शिल्पाने २००९ मध्ये राज कुंद्राशी लग्न केलं. या दोघांना वियान हा मुलगा तर समिशा ही मुलगी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 1:57 pm

Web Title: shilpa shetty says she will give her 20 carat diamond to son viaan future wife only if she meets this condition ssv 92
Next Stories
1 भावाच्या लग्नानंतरच येणार; मुंबई पोलिसांच्या समन्सला कंगनाचं उत्तर
2 पूनम पांडेच नव्हे तर ‘हे’ कलाकारही वादाच्या भोवऱ्यात; केला आक्षेपार्ह व्हिडीओ शूट
3 जेव्हा भन्साळींसोबत काम करण्यासाठी सोनमला बोलावं लागलं होतं खोटं
Just Now!
X