बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची मुलगी समिषा आज १५ फेब्रुवारी रोजी एक वर्षांची झाली आहे. त्यानिमित्ताने शिल्पाने तिचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
शिल्पाने आजपर्यंत तिच्या मुलीचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. समिषाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिने एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समिषा ‘मम्मा’ बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये समिषा अतिशय क्यूट दिसत आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : गँगस्टर अरुण गवळी होणार आजोबा, मुलीने दिली गोड बातमी
समिषाचा हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने छान असे कॅप्शन दिले आहे. ‘मम्मा हे तुझ्या तोंडून ऐकणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… ‘ या आशयाचे कॅप्शन शिल्पाने दिले आहे.
२१ फेब्रुवारी २०२०मध्ये शिल्पा शेट्टीने आई झाल्याची गोड बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. “ओम श्री गणेशाय नमः। आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला एका चमत्काराच्या रुपाने मिळाले आहे” अशा आशयाचे कॅप्शन देत शिल्पाने मुलीने तिचे बोट पकडतानाचा फोटो शेअर केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 11:19 am