बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा सध्या पती राज कुंद्रासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. शिल्पाने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील शिल्पाच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये शिल्पा समुद्र किनारी बसली आहे. या फोटोमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे. या लूकमध्ये शिल्पा अतिशय हॉट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

शिल्पाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. शिल्पाची बहिण शमिता शेट्टीने देखील कमेंट केली आहे. तिने हार्टचे इमोजी वापरले आहेत. सध्या शिल्पाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

शिल्पा लवकरच ‘हंगामा २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मीजान जाफरी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ती ‘निकम्मा’ या चित्रपटात देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.