Advertisement

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा मोठा खुलासा; म्हणाली, “खरा आरोपी तर…!”

राज कुंद्रा प्रकरणात मुंबई पोलिसांनी नुकतीच शिल्पा शेट्टीची चौकशी केली. या चौकशीत शिल्पा शेट्टीने मोठा खुलासा केलाय.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रासह आयटी प्रमुख रयान थारप यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. राज कुंद्रा आणि त्याची मेव्हणी शमिता शेट्टी एकत्र चित्रपट करणार होते, असा खुलासा काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री गहना वशिष्ठने केला होता. मुंबई पोलिसांनी नुकतीच शिल्पाची चौकशी केली. या चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीने एक मोठा खुलासा केलाय.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या चौकशी दरम्यान राज कुंद्रा याच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणात प्रकरणात तिचाही सहभाग आहे का, असा प्रश्न मुंबई पोलिसांनी केला. यावर शिल्पा शेट्टीने तिचा या प्रकरणाशी कसलाच संबंध नसल्याचं सांगितलंय. तसंच अश्लील चित्रपट बनविण्यात तिची काही भूमिका नसल्याचे देखील तिने म्हटलंय. सहा तास सुरू असलेल्या या चौकशीत अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पतीला निर्दोष असल्याचं सांगत राज कुंद्राच्या मेव्हण्याबाबत मोठा खुलासा केलाय. तसंच ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅपवर तयार करण्यात येत असलेल्या अश्लील व्हिडीओ संदर्भात तिला कोणतीही माहिती नसल्याचं सांगत ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅप आणि तिचा दूर दूरचा संबंध असल्याचं देखील तिने या चौकशीत म्हटलं. पती राज कुंद्राचा सुद्धा या प्रकरणात कसलाच सहभाग नसल्याचं शिल्पा शेट्टीनं म्हटलंय.

ते अश्लील चित्रपट नसून इरॉटिक चित्रपट आहेत

पोलिसांच्या चौकशी दरम्यान शिल्पा म्हणाली की, “हॉटशॉट्स या अ‍ॅपवर पती राज कुंद्राचे येणारे चित्रपट हे अश्लील चित्रपट नसून इरॉटिक चित्रपट आहेत. यापेक्षा जास्त अश्लील चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळतात, ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅपवर अश्लील व्हिडीओ तयार करण्यात पती राज कुंद्राचा सहभाग नव्हता”, असं सांगत शिल्पा शेट्टी पतीचा बचाव करताना दिसून आली.

 

मेव्हण्यावर केले आरोप

राज कुंद्रा अश्लील व्हिडीओ प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आलाय. मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत अभिनेत्री शिल्पा शेट्टीने राज कुंद्रा याच्या मेव्हण्यावर आरोप केलेत. यात तिने म्हटलं, “राज कुंद्रा याचा मेव्हणा प्रदीप बक्षी हा खरा आरोपी असून तो सध्या लंडनमध्ये आहे.” ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅप आणि त्यावर सुरू असलेल्या कामांमध्ये प्रदीप बक्षीचा सहभाग असल्याचं या चौकशीत शिल्पा शेट्टीनं म्हटलंय.

राज कुंद्राचा मेव्हणा आहे प्रदीप बक्षी

प्रदीप बक्षी हा राज कुंद्राच्या बहिणीचा पती आहे. सध्या तो लंडनमध्ये राहत असून केनरिन प्रायव्हेट लिमिटेड एक कंपनीचा तो मालक आहे. प्रदीप बक्षी केनरिनचा अध्यक्षही आहे. राज कुंद्राने 2019 मध्ये ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅप केनरिनला जवळपास 18 लाख रुपयांना विकले. याशिवाय राज कुंद्राचा व्यवसाय भागीदार सुद्धा आहे. राज कुंद्रा आणि त्याचा मेव्हणा प्रदीप बक्षी या दोघांमधील स्फोटक व्हॉट्सअ‍ॅप चॅट सुद्धा यापूर्वी समोर आले आहेत. या चॅटमध्ये पैशांची देवाण-घेवाण कशी झाली आणि अश्लील कंटेटद्वारे अ‍ॅडवान्स रक्कम कशी मिळवली गेली. हे दोघांच्या संभाषणात समोर आलं आहे.

 

21
READ IN APP
X
X