20 October 2020

News Flash

अभिनेत्रीने सुनील ग्रोवरसोबत काम करण्यास दिला नकार; निर्मात्यांवर केला फसवणूकीचा आरोप

सुनील ग्रोवरचा 'गॅग्स ऑफ फिल्मीस्तान' वादाच्या भोवऱ्यात

विनोदी अभिनेता सुनील ग्रोवर ‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या शोचं येत्या ३१ ऑगस्टपासून प्रसारण होणार आहे. परंतु प्रसारित होण्यापूर्वीच हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने सुनील ग्रोवरसोबत काम करण्यास नकार दिला आहे. “निर्मात्यांनी मला फसवलं आहे. या शोमध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जात आहे.” असे आरोप शिल्पाने केले आहेत.

रस्त्यावरील चहावाला ते सुपरमॉडेल; एका फोटोमुळे रातोरात सुपरस्टार झालेले ‘सात’ कलाकार

‘भाभीजी घर पर है’ या विनोदी मालिकेतून नावारुपास आलेली शिल्पा शिंदे सध्या ‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ या शोमुळे चर्चेत आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने या शोच्या निर्मात्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “निर्माते सातत्याने कलाकारांशी खोटं बोलत आहेत. सुरुवातीला आम्हाला फक्त आठवड्यातून दोन दिवस काम करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. पण आता आमच्याकडून १२-१२ तास काम करुन घेतलं जात आहे. या शोचं केंद्रस्थान सुनील ग्रोवर आहे. आम्ही फक्त मागे उभं राहून टाळ्या वाजवण्याचं काम करत आहोत. इतक्या दिवसांत मला स्क्रिप्ट देखील मिळाली नाही. अशा शोमध्ये मी दिर्घ काळ काम करु शकत नाही. निर्मात्यांनी मला फसवलं आहे. या शोमध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जात आहे.”

या १० अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारली नागिन; तुमची फेव्हरेट कोण?

शिल्पा शिंदे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २००२ साली तिने ‘भाभी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘लापता गंज’, ‘हातिम’, ‘संजिवनी’, ‘मेहेर’, ‘कानपुर वाले खुरानाज’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. ‘बिग बॉस’ आणि ‘भाभीजी घर पर है’ या दोन मालिकांमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. सध्या ती ‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ या शोमध्ये काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 1:59 pm

Web Title: shilpa shinde gangs of filmistan sunil grover mppg 94
Next Stories
1 Video : ऐश्वर्या रायचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
2 “मला ग्लॅमरस म्हणू नका मी टॉमबॉय आहे”; ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ची चाहत्यांना विनंती
3 ‘बिग बॉस १४’साठी सलमान घेणार इतके मानधन?
Just Now!
X