सब टीव्हीवर‘लापतागंजः एक बार फिर’ही विनोदी मालिक सुरू होत आहे. ज्यात ‘भाभी’ ‘मायका’ ‘चिडीया घर’ मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखविणारी शिल्पा शिंदे दिसणार आहे. या अगोदर तिने चिडीया घर, बेचारा बिग बी यांमध्ये विनोदी भूमिका केली आहे. आणि आता पुन्हा ती ‘लापतागंजः एक बार फिर’मध्ये विनोदी भूमिका करणार आहे, त्यामुळे असे वाटते की शिल्पाला विनोदी मालिकांमध्ये काम करणे खूपच आवडते.
या भूमिकेविषयी शिल्पा म्हणाली की, यात एका कॅथलिक मुलगी मेरी डिमेलो ची भूमिका मी करत आहे. जी शिक्षिका असून, लापतागंज मध्ये रहाण्यासाठी आली आहे. आपली संस्कृती आणि सभ्यता ती चांगल्याप्रकारे ओळखते. यात कॅथलिक मुलीची भूमिका असल्यामुळे मी नेहमीच मॉडर्न आणि वेस्टर्न ड्रेस मध्ये दिसून येईन. प्रेक्षकांनाही ती खूप आवडेल. तसे पहाल तर विनोदी भूमिका करणे सोपे नसते. पण, अनेक मालिकांमध्ये विनोदी भूमिका केल्याचा अनुभव असल्याने मी चांगल्या प्रकारे विनोदी भूमिका करू शकले. मला खात्री आहे की प्रेक्षक मला या नवीन शो मध्ये नवीन भूमिकेत आणि नवीन लूक मध्ये नक्कीच पसंत करतील.