News Flash

‘अंगूरी भाभी’ फेम शिल्पा शिंदेचा निर्मातीच्या नवऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

वाळीव पोलीस स्थानकात एफआयआर दाखल

अभिनेत्री शिल्पा शिंदे

टीव्ही मालिका ‘भाभी जी घर पर है’ मधील जुनी अंगूरी भाभी म्हणजे शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिल्पाने निर्माती बेनिफर कोहलीचा पती संजय कोहली विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाने मुंबईतील वाळीव पोलीस स्थानकात संजयविरोधात एफआयआर दाखल केली आहे. संजय तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा आणि तडजोडीसाठी विचारायचा. तू मला फार आवडतेस, तू खूप सेक्सी आहेस, तू खूप हॉट आहेस, मी तुझा खूप मोठा चाहता आहे… अशा पद्धतीने संजय शिल्पाशी बोलायचा.

याआधीही शिल्पाने मध्येच करार मोडल्यामुळे बेनिफरने तिच्याकडून १२ कोटी रुपयांची मागणी केली होती. बेनिफरच्या मागणीवर मुंबईत सिनेमा आणि टीव्ही कलाकारांची संघटना ‘सिनेटा’ने शिल्पाच्या काम करण्यावर प्रतिबंध घातला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2017 9:51 pm

Web Title: shilpa shinde sexual harassment case bhabhi ji ghar par hai
Next Stories
1 चार सिनेमे, चार अभिनेत्री, ‘हिरो’ईनची बदलती रुपं
2 ‘सैराट’चा कन्नड ट्रेलर पाहिलात का?
3 रणवीर सिंगचा हा सुप्त गुण तुम्हाला माहिती आहे का?
Just Now!
X