News Flash

खोटं बोलणं थांबवा म्हणत शिल्पा शिंदेने शेअर केले स्क्रीनशॉट

तिने शोच्या निर्मात्यांवर निशाणा साधला आहे.

‘भाबीजी घर पर है’ मालिकेत भूमिका साकारणारी आणि बिग बॉस ११ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे एका वेगळ्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. ती कॉमेडीयन सुनील ग्रोवरच्या ‘गँग ऑफ फिल्मिस्तान’ या शोमध्ये दिसणार होती. पण शो प्रदर्शित होण्यापूर्वीच शिल्पाने काम करण्यास नकार दिला. शोमध्ये सुनील ज्युनिअर आर्टिस्टप्रमाणे वागणूक देत होता. तसंच तो स्वत:शिवाय कोणालाच लाइमलाइटमध्ये येऊ देत नव्हता असे शिल्पाने म्हटले होते. पण शोची प्रोड्यूसर प्रीती आणि निती सिमोस यांनी शिल्पासोबतचे व्हॉट्स अॅप चॅट लीक केले होते. त्यानंतर शिल्पाने देखील स्क्रीन शॉट शेअर करत लाज वाटली पाहिजे असे म्हटले आहे.

या स्क्रीनशॉटमध्ये सत्य समोर आले तर त्रास झाला का ? असे शिल्पाने म्हटले आहे. त्यावर शिल्पाने ‘सत्य लवकरच समोर येईल. त्यामुळे खोट्या अफवा पसरवणे बंद करा. आता सत्य समोर आले तर त्रास होत आहे का? माझ्याकडे फोन कॉल्स रेकॉर्डींग सुद्धा आहे. ज्यामध्ये मी म्हटले होते की मला सुनील ग्रोवर सोबत काम करायचे नाही. ते पण शेअर करु का?’ असे शिल्पाने म्हटले आहे.

यापूर्वी शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. ज्यामध्ये तिने सांगितले होते की तिला या मालिकेत काम करायचे नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 5:08 pm

Web Title: shilpa shinde slams gangs of filmistan producers and shares screenshots avb 95
Next Stories
1 “मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण…”; राष्ट्रवादीचा कंगनाला टोला
2 वाघिण मुंबईत येतेय दम असेल तर रोखून दाखवा, बबिता फोगाटचा कंगनाला पाठिंबा
3 “मी कंगना रणौत आहे, माझी प्रसिद्धी आणि कमाई ही कोणत्याही मंत्र्यापेक्षा…”; भाजापाचा उल्लेख करत कंगानाचे ट्विट
Just Now!
X