छोट्या पडद्यावरची अभिनेत्री शिल्पा शिंदे ही बिग बॉसच्या ११ व्या सिझनची विजेती ठरली. हा शो जिंकल्यानंतर शिल्पाला बक्षिसाच्या रुपात मोठी रक्कम मिळाली. आता या पैशांचं ती काय करणार? असा प्रश्न साहजिक तिला अनेकांनी विचारला. या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर तिनं दिलं आहे. जर तिनं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं तर तिच्या चाहत्यांना नक्कीच तिचा अभिमान वाटेल.

नुकतीच शिल्पानं ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बक्षिसाच्या रक्कमेचं तू काय करणार आहे? असा प्रश्न तिला विचारला होता. ‘ मी हा शो जिंकेन याची कल्पना मी कधीही केली नव्हती. पण, हा शो मी जिंकले. यातून मिळालेली रक्कम मी समाजसेवेसाठी खर्च करणार आहे असं ती म्हणाली. शिल्पाच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. शिल्पा आपल्या वडिलांच्या खूपच जवळ होती. हे पैसे मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खर्च करेन अशी इच्छा तिनं बोलून दाखवली.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

शिल्पाला वृद्धांसाठी डे- केअर सेंटर सुरू करायचं आहे. आजूबाजूला मी अशी अनेक मुलं पाहते ज्यांचे आई- वडील खूपच म्हातारे झाले आहेत. त्यांची काळजी घ्यायला घरात कोणीही नाही. मुलांना नोकरी सोडून त्यांच्याकडे लक्ष देणं कधी कधी अवघड होते. त्यांच्या जेवणाच्या औषधाच्या वेळा सांभाळताना दमछाक होते. नोकरी सोडणं शक्य नसते. त्यामुळे अशा वृद्ध आजी – आजोबांसाठी आम्हाला डेकेअर सेंटर सुरु करायचं आहे. जिथं मुलं आपल्या वृद्ध आई -वडिलांना काही तासांकरता सोडून निवांत कामावर जाऊ शकतात. त्यांच्यासाठी या डे केअर सेंटरमध्ये मला वेगवेगळे उपक्रम सुरू करायचे आहेत. येथे आजी- आजोबांचा वेळ छान जाईल. शिवाय त्यांच्याच वयाचे अनेक लोक त्यांना भेटतील. त्यांची काळजी घेण्यासाठी अनेक कर्मचारी असतील जे त्यांच्या जेवणाच्या आणि औषधाच्या वेळा सांभाळतील असंही ती म्हणाली. सध्या शिल्पा या संकल्पनेवर काम करत आहे. यासाठी बिग बॉसमधूना जिंकलेली पूर्ण रक्कम खर्च करण्याची तयारी तिनं दर्शवली आहे.