01 March 2021

News Flash

शिल्पा शिंदे ठरली ‘बिग बॉस ११’ची विजेती; हिना खान दुसऱ्या स्थानावर

रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली.

'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली.

टेलिव्हिजनवरील बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. तर विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्या काही दिवसांमध्ये हिनाची शोमधील लोकप्रियता वाढली होती. मात्र, अंतिम फेरीत शिल्पा माँ उर्फ शिल्पा शिंदे हिने तिच्यावर सरशी साधली. बिग बॉसचा यंदाचा अंतिम सोहळा चांगलाच रंगला. यावेळी पुनीश आणि बंदगीचा पूल डान्स, अर्शी खान आणि हितेन तेजवानी या जोडगोळीचा रेट्रो स्टाईल परफॉर्मन्स, हिना खान- लव्ह त्यागी आणि प्रियांक शर्मा या त्रिकुटाच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या ११ व्या पर्वाचा विजेता कोण असणार या संदर्भात अनेक तर्क लढवले जात होते. या रिअॅलिटी शोची सुरूवात १९ स्पर्धकांनी झाली. अंतिम फेरीत विकास गुप्ता, शिल्पा शिंदे, हिना खान आणि पुनीश शर्मा हे चार स्पर्धक दाखल झाले होते. संपूर्ण पर्वात शिल्पा शिंदेच प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या पर्वाची विजेतीही तीच होईल असे अनेकांचे म्हणणे होते. ही शक्यता अखेर खरी ठरली.

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 11:36 pm

Web Title: shilpa shinde wins bigg boss 11 hina khan takes the second spot
Next Stories
1 Padmavat: ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाचा मुहुर्त अखेर ठरला!
2 वरुण धवनने शेअर केले ‘ऑक्टोबर’ सिनेमाचे ५० पोस्टर्स
3 माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी सिनेमाचा पोस्टर पाहिलात का?
Just Now!
X