03 March 2021

News Flash

‘लैंगिक दृष्यांमधून गुरु-शिष्य परंपरेला बदनाम करण्याचा नेटफ्लिक्सचा प्रयत्न’; शिवसेना कार्यकर्त्याची तक्रार

'नेटफ्लिक्सवर हिंदू धर्माची बदनामी करणारा कंटेंट निर्माण केला जातो'

'सिक्रेड गेम्स'

शिवसेनेच्या आयटी सेलमधील कार्यकर्ते असणाऱ्या रमेश सोलंकी यांनी नेटफ्लिक्सविरोधात काळबादेवी येथील एलटी मार्ग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नेटफ्लिक्सवरुन हिंदू धर्माची बदनामी होत असल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचे सोलंकी यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. लैंगिक दृष्यांच्या आधारे भारतीय संस्कृतीमधील गुरु शिष्याची परंपरेला बदमान करण्याच्या प्रयत्न या सिरीजमधून करण्यात आला आहे असंही सोलंकी यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

जगभरात लोकप्रिय असणाऱ्या नेटफ्लिक्सच्या माध्यमातून हिंदू धर्माचे चुकीचे चित्र प्रेक्षकांसमोर उभे केले जात आहे. त्यामुळे जगभरात हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती पोहचत असल्याचे सोलंकी यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. ‘या तक्रारीची एक प्रत आणि नेटफ्लिक्सवरील व्हिडिओची सीडी पुरावा म्हणून मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि सायबर सेलकडे पाठवणार आहे. नेटफ्लिक्सवरील प्रत्येक सिरीजमध्ये हिंदू धर्माला बदनाम केले जाते. आपल्या देशाची वाईट प्रतिमा निर्माण करणारा कंटेट नेटफ्लिक्स निर्माण करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे सर्व केले जात आहे,’ असे मत सोलंकी यांनी ‘डीएनए’शी बोलताना व्यक्त केले आहे.

‘सिक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या सिरीजमधून हिंदू धर्माला बदनाम करण्यात आले आहे. जगभरातील सर्व गुन्ह्यांसाठी हिंदू जबाबदार असल्याचे या सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘वेदांमधील अहम ब्रम्हास्मी आणि सिक्रेड गेम्सचे संगीत हे एखादी युद्ध घोषणा असल्यासारखे दाखवले जात आहे. एकमेकांना भेटल्यावर लोक हे शब्द वापरुन शुभेच्छा देत मानवतेविरुद्ध कारवाई करण्यास प्रवृत्त करतात असे या सिरीजमध्ये दिसतं. लैंगिक दृष्यांच्या आधारे भारतीय संस्कृतीमधील गुरु शिष्याची परंपरेला बदमान करण्याच्या प्रयत्न या सिरीजमधून करण्यात आला आहे,’ असं सोलंकी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सिक्रेड गेम्सबरोबरच सोलंकी यांनी नेटफ्लिक्सवरील हिमा कुरेशीची भूमिका असणाऱ्या ‘लैला’, राधिका आपटेची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘घौल’ आणि हसन मिन्हाज याच्या स्टॅण्डअप कॉमेडी शोच्या माध्यमातून देशाची आणि हिंदू धर्माची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 9:52 am

Web Title: shiv sena man files plaint against netflix for anti hindu content scsg 91
Next Stories
1 “भारतात जरी वाढलो असलो, तरी पाकिस्तानच मूळ घर”
2 रणबीर-आलियाचा तो फोटो पाहून सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या
3 रानू मंडल यांच्याबाबत गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणतात….
Just Now!
X