08 March 2021

News Flash

Photo : ‘बिग बॉस’साठी ड्रामा नव्हे तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही शिव-वीणा एकत्र

बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुलतानाचं पाहायला मिळालं. अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला.

शिव-वीणा

वादविवाद, भांडणं, एकमेकांवर कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप, अफेअर्स या सर्वांसाठी ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो ओळखला जातो. ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन नुकताच संपला आणि या सिझनमध्येही एक जोडी खूप चर्चेत राहिली. ही जोडी म्हणजे शिव ठाकरे व वीणा जगताप. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुलतानाचं पाहायला मिळालं. अनेकांना हा पब्लिसिटी स्टंटसुद्धा वाटला आणि बिग बॉसनंतर हे दोघं एकत्र राहणार नाहीत असा अंदाज व्यक्त केला गेला. मात्र शिव-वीणाची सोशल मीडियावरील पोस्ट या सर्व चर्चांना खोटं ठरवत आहे.

शिव-वीणाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ कॉलिंगचा स्क्रिनशॉट पोस्ट केला आहे. सैफ-करीनाचं सैफीना, विराट-अनुष्काचा विरुष्का याप्रमाणे शिव-वीणाचा शिवीणा असं नाव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस’नंतर हे दोघं लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं.

Photo : कल्की कोचलीन दुसऱ्यांदा संसार थाटण्यास सज्ज?

”वीणाशी लग्नाबाबत मी कुटुंबीयांशी बोलणार असून माझ्या आईचं मत काय आहे हे आधी पाहावं लागेल,” असं शिवने म्हटलं होतं. शिव हा ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला आहे. बक्षीस म्हणून त्याला १७ लाख रुपये मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 4:32 pm

Web Title: shiv thakare and veena jagtap love is in the air watch photos ssv 92
Next Stories
1 नवऱ्याबरोबर ‘ती’ गोष्ट शक्य नाही; विद्याने दिले नवऱ्याबरोबर काम न करण्याचे कारण
2 एस्कॉर्ट सर्व्हिसच्या पोस्टरवर छापला फोटो व नंबर; अभिनेत्रीची पोलिसात धाव
3 …म्हणून ऋषी कपूर स्वत:च्या लग्नात पडले होते बेशुद्ध
Just Now!
X