News Flash

‘बिग बॉस मराठी २’नंतर शिव आणि वीणा या ठिकाणी जाणार फिरायला

या दोघांच्या मैत्रीचे किस्से घरातच नाही तर घराबाहेर प्रेक्षकांमध्येही रंगत आहेत.

शिव ठाकरे, वीणा जगताप

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी म्हणजे शिव आणि वीणा. या दोघांच्या मैत्रीचे किस्से घरातच नाही तर घराबाहेर प्रेक्षकांमध्येही रंगत आहेत. शिव आणि वीणाचं हे प्रेम ‘बिग बॉस’नंतरही कायम राहणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हे दोघं गेल्या अनेक दिवसांपासून गोव्याला जाण्याचा बेत रचत आहेत आणि आता त्या योजनांना अंतिम रुप मिळाले आहे. वूटवरील अनसीन अनदेखाच्या नवीन क्लिपमध्ये शिव आणि वीणा गोव्याच्या ट्रिपची प्लॅनिंग करताना दिसत आहेत.

गोव्याला कोणत्या तारखेला जायचं हे दोघं मिळून ठरवत आहेत आणि गणपतीनंतरचे चार दिवस योग्य आहेत का ते तपासत आहेत. वीणा म्हणते, ”चार दिवस खूप होतात तरी मी खूप फिरलेय. म्हणजे १५ ला जायचं आणि १८ पर्यंत परत, आपल्याला चार दिवस मिळतात फिरायला.” यावर उत्साहित होऊन शिव म्हणतो, ”तीन दिवसांतच फिरून होईन आपलं, पण तिथे फिरण्यासारखं काय आहे? मी कधीच गोव्याला गेलो नाही.” त्यावर वीणा म्हणते, ”कधीच नाही गेला? तर चल मै घुमाती हूँ.” याबाबतीत शिव विचारतो, ”गोव्याला सगळ्यात सुंदर समुद्रकिनारा कोणता आहे?” यावर वीणा म्हणते, ”समुद्रकिनारे सगळे सारखेच आहेत. पण त्यातही अंजुना आणि कॅन्डोलिम मला सर्वाधिक आवडतात.”

आणखी वाचा : जेव्हा शिवानीने दिली लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरी भेट

वीणा प्रवासाची योजना आखते आणि म्हणते, ”आपण १५ ला गोव्यात कुठेतरी फिरू. १६ ला बागा बीच आणि १७ ला पणजी. संध्याकाळी कॅसिनोमध्ये मजा करू” शिव कॅसिनोमध्ये रोले खेळण्याची इच्छा व्यक्त करतो आणि विचारतो की, कॅसिनो रात्रभर चालू असते का? यावर वीणा बोलते, ”हो, २४x७. तीन मजले आहे ज्‍यात ते खालचा सकाळी बंद करतात.” ती पुढे इतर मजले आणि तेथील गोष्‍टींचे वर्णन करते.

बिग बॉस घर सोडल्‍यानंतर देखील दोघे एकत्रच असतील का, याबाबत वेळच सांगेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 6:22 pm

Web Title: shiv thakare and veena jagtap will visit this place after bigg boss marathi 2 finale ssv 92
Next Stories
1 फोटोशूटच्यावेळी अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छळ; मराठी अभिनेत्याला अटक
2 मानधन कमी मिळाल्याने अभिनेत्रीचा बिग बॉस १३ला नकार
3 ”भन्साळी गद्दारी करणार नाहीत,” चित्रपटाच्या वादावर सलमानने सोडलं मौन
Just Now!
X