News Flash

शितलीच्या ‘लग्नाची पिपाणी’, शिवानी बावकर पुन्हा चर्चेत

जाणून घ्या काय आहे कारण...

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’मधून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. शितली या तिच्या भूमिकेने अनेकांच्या मनात घर केले होतो. या मालिकेतील तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या मनावर जादू करत होता. आता ही शितली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या चर्चा शिवानीचा नवा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

आतापर्यंत लग्नाची अनेक गाणी आली, त्यातली काही प्रचंड लोकप्रियही झाली. आता त्यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या “लग्नाची पिपाणी” या नव्या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी या गाण्यात दिसत आहे.

म्युझिक व्हिडिओची निर्मिती सुधाकर फाळके आणि प्रकाश फाळके यांनी केली आहे. तर म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन प्रकाश फाळके यांचं आहे. दिनकर खाडे यांचं गीत मधुर मिलिंद शिंदे यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे. सचिन कांबळे यांनी नृत्य दिग्दर्शन, सुनीत गुरव यांनी छायांकन केलं आहे.

अलिबाग आणि जुन्नर या ठिकाणी हा म्युझिक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे. शिवानीचा “लग्नाची पिपाणी” हा म्युझिक अल्बम सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती अनोख्या अंदाजात दिसत आहे. तसेच सचिन आणि शिवानीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्यामुळे शिवानीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 10:59 am

Web Title: shivani bahvkar new album avb 95
Next Stories
1 Video: अनिता हसनंदानीने मुलाच्या कानात गुणगुणला गायत्री मंत्र, अशी होती चिमुकल्याची प्रतिक्रिया
2 परदेशात प्रियांकाने सुरु केले भारतीय रेस्टॉरंट
3 नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे कालवश
Just Now!
X