News Flash

शिवानी बावकरचा ‘युथट्यूब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'लागिरं झालं जी' या मालिकेत शिवानीने शितल ही व्यक्तीरेखा साकारली आहे.

शिवानी बावकर

समाजात स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, त्यांच्यासोबत केले जाणारे गैरव्यवहार ही विदारक परिस्थिती बघता ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या विधानासमोर प्रश्नचिन्ह उभे रहाते. घरात, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, शाळेत प्रत्येक ठिकाणी महिलांना अनेकदा अपमानास्पद आणि घृणास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते. याच परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारा ‘मिरॅकल्स अकॅडमी’ प्रस्तुत आणि प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित ‘युथट्यूब’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे आणि त्या विरोधात महिलांनीच काहीतरी ठोस पावलं उचलायला हवी. महिला सबलीकरण हे केवळ बोलण्यापुरती मर्यादित न रहाता आचरणातही आणले गेले पाहिजे. जे हात लाटणं धरू शकतात तेच हात वेळ पडल्यास हातात शस्त्रही घेऊ शकतात, गरज असते ती केवळ स्वतःतील आंतरिक शक्तीला जागं करण्याची. स्वसंरक्षणासाठी स्वतःला कणखर करण्याची. हाच संदेश देत, स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देणारा ‘युथट्यूब’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून तो १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्त्रियांच्या सामाजिक समस्यांवर भाष्य करत असताना सोशल मीडियाचा वापर करताना ‘अखंड सावध असावे’ हा संदेशही चित्रपट तरुण पिढीला देतो. सोशल मीडियासारखे दुधारी शस्त्र आजच्या पिढीच्या हातात आहे. त्याचा विघातक वापर करण्यापेक्षा विधायक वापर करायला हवा. खटकणाऱ्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला हवा. अशा असंख्य पैलूंना स्पर्श करत ‘युथट्यूब’ चित्रपटाची कथा खुलत जाते.

‘युथट्यूब’ या चित्रपटात ‘मिरॅकल्स अॅक्टिंग अॅकडमी’तील ३०० विद्यार्थी झळकणार आहेत. शिवानी बावकर, पूर्णिमा डे, शर्वरी गायकवाड, मृण्मयी कुलकर्णी, सिद्धांत धोत्रे, विनय रावल, रतीश आरोलकर, अनिकेत वाघ आदि कलाकारांसोबत मधुराणी प्रभुलकर यात पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे. मिरॅकल्स फिल्म्स प्रस्तुत आणि प्रमोद प्रभुलकर लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित ‘युथट्यूब’ या चित्रपटाची सहनिर्मिती मयुरपंख मिडिया आणि इन्फ्रा यांची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 2:23 pm

Web Title: shivani bavkar marathi movie youthtube
Next Stories
1 Thackeray Box Office Collection : ‘ठाकरे’च्या पहिल्या दिवसाची कमाई माहित आहे का ?
2 Manikarnika Box Office Collection : जाणून घ्या कंगनाच्या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई
3 डोंबिवली माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग – संदीप कुलकर्णी
Just Now!
X