22 September 2020

News Flash

Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे करते याला डेट

एका क्लिपमध्ये शिवानी किशोरी शहाणे यांना तिने आणि तिच्या बॉयफ्रेंडने काढलेल्या टॅट्यूबद्दल सांगताना दिसली.

बिग बॉस मराठी पर्व २मध्ये काही दिवसांपूर्वीच आजारपणाचे कारण देऊन घरातून बाहेर पडलेल्या शिवानी सुर्वेची घरात पुन्हा एण्ट्री झाली. त्यामुळे घरातील काही सदस्यांना आनंद झाला तर काहींना शिवानीचे येणे आवडले नाही. स्पष्टवक्तेपणाने आपला मुद्दा मांडणे, घरामध्ये अनेक वेळा वाद घालणे आणि तेवढ्याच ताकदीने दिलेला टास्क पूर्ण करणे यासाठी शिवानी सुर्वे खास ओळखली जाते. नुकताच वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या एका क्लिपमध्ये शिवानी किशोरी शहाणे यांना तिने आणि तिच्या बॉयफ्रेंडने काढलेल्या टॅट्यूबद्दल सांगताना दिसली.

शिवानीने तिच्या हातावर कपल टॅट्यू काढला आहे. तो टॅट्यू पाहून ‘हे काय आहे? मुकूट आहे का? आणि ते कशासाठी काढले आहे?’ असा प्रश्न किशोरी शिवानीला विचारतात. त्यावर शिवानी ‘मी आणि अंजिक्य दोघेही इमॅच्युअर होतो. जेव्हा आम्ही ऐकमेकांना समजून घ्यायला ओळखायला लागलो तेव्हा मी १९ वर्षांची होते आणि अजिंक्य २२ वर्षांचा. तेव्हा टॅट्यूची फॅशन आली होती. आम्ही दोघांनीही कपल टॅट्यू काढायचा म्हणून मी राणीचा मुकूट काढला आणि अजिंक्यने राजाचा मुकूट’ असे ती म्हणाली.

‘पण आम्ही जिथे टॅट्यू काढायला गेलो त्याने तो टॅट्यू चांगला काढलाच नाही. बघा ना कसा काढलाय वेडा वाकडा! माझी अनेकांनी यावरुन खिल्ली उडवली. पण अजिंक्यचा टॅट्यू खूप छान आलाय. आम्ही अशाच गप्पा मारत बसलो होतो आणि ६-६:३० ला ढरवलं की टॅट्यू काढायचा. ८ वाजता गेलो आणि दोघे टॅट्यू काढून आलो’ असे शिवानी म्हणाली.

शिवानीच्या बॉयफ्रेंडचे नाव अजिंक्य ननावरे असून तो देखील एक अभिनेता आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘सख्या रे’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालितकांमध्ये अजिंक्यने काम केले आहे. शिवानी आणि अंजिक्यने ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत एकत्र काम केले आहे. दरम्यान त्या दोघांमध्ये चांगली मैत्री जमली आणि त्याच काळात ते दोघे ऐकमेकांच्या प्रेमात पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 10:06 am

Web Title: shivani surve is dating this marathi actor avb 95
Next Stories
1 दोन केळ्यांचं बिल ४४२ रुपये , फाईव्ह स्टार हॉटेलला २५ हजारांचा दंड
2 The Lion King : संगणकीय अद्भुत आविष्कार
3 युद्धपटांची वानवा!
Just Now!
X