23 January 2020

News Flash

Bigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वेला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

हिना पांचाळसोबत गप्पा मारत असताना शिवानीने तिच्या भीतीबद्दल सांगितलं.

शिवानी सुर्वे

आजारपणाचे कारण देत अभिनेत्री शिवानी सुर्वे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडली होती. आता घरात ती परतली आहे. ‘वूट’च्या ‘अनसीन अनदेखा’च्या नुकत्याच एका क्लिपमध्‍ये शिवानी तिला अंधाराची आणि भूतांची भीती वाटत असल्‍याचं सांगताना दिसतेय.

”तुला एकटं राहावं लागलं तर तू राहू शकतेस का?” असा प्रश्न हिनाने शिवानीला विचारला तेव्हा ती म्‍हणाली, ”मी एकटी राहूच शकत नाही, कधीच नाही. मी एक दिवस पण एकटी राहिली नाही.” शिवानी पुढे म्‍हणाली, ”मला भूतांची भीती वाटते. कोणीतरी येणार अशी सतत भीती मला वाटते. नशीब मी भूताच्या टास्‍कवेळी घरात नव्‍हते. हे सगळं निरर्थक आहे हे मला माहित आहे. पण वाटते मला भीती.”

हे ऐकून नेहा तिची मस्‍करी करत म्‍हणते की, भूत टाक्‍सच्‍या वेळी शिवानीला घाबरवण्‍यासाठी तिने भूतासारखा पेहराव करुन तिना घाबरवलं असतं. यावेळी अंधाराचीही भीती वाटत असल्याचं शिवानीने सांगितलं. याबद्दलचा किस्साही तिने सांगितले. घरात लाइट गेलेली असताना शिवानी बेडरुममधून धावत बाहेर पडली. इमारतीच्या बाहेर येऊन ती उभी राहिली आणि लाइट येईपर्यंत ती तिथेच बसून राहिली होती.

First Published on July 19, 2019 2:18 pm

Web Title: shivani surve scared of these things bigg boss marathi 2 ssv 92
Next Stories
1 आठवणींमध्ये रमवणारा ‘खिचिक’
2 या राज्यांमध्ये हृतिकचा ‘सुपर ३०’ टॅक्स फ्री
3 Photo : युवराज सिंग व एक्स गर्लफ्रेंड किम शर्माचा फोटो व्हायरल
Just Now!
X