26 August 2019

News Flash

‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे

स्पष्टवक्तेपणाने आपला मुद्दा मांडणे, घरामध्ये अनेक वेळा वाद घालणे आणि तेवढ्याच ताकदीने दिलेला टास्क पूर्ण करणे यासाठी शिवानी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे.

शिवानी सुर्वे, महेश मांजरेकर

गेल्या आठवड्याभरापासून ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सर्वाधिक कोणाची चर्चा झाली असेल तर ती म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या एण्ट्रीची. आजारपणाचं कारण देत शिवानी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली पण तिच्या चाहत्यांना हे फार खटकलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा ती घरात आली आहे आणि गुगलवर गेल्या आठवड्याभरातील शिवानीचा सर्च वाढला आहे. इतकंच नव्हे तर सर्चच्या बाबतीत शिवानीने ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनाही मागे टाकलं आहे.

‘गुगल ट्रेण्ड्स’चा आढावा घेतला तर गेल्या सात दिवसांत म्हणजेच जेव्हापासून शिवानीच्या परतण्याची चर्चा सुरू झाली तेव्हापासून गुगलवर तिचा सर्च वाढल्याचं दिसत आहे. ९ जून ते १५ जून दरम्यान हा सर्च सर्वाधिक होता.

आश्चर्याची बाब म्हणजे, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, आंध्रप्रदेश या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये तिचा सर्च जास्त आहे. स्पष्टवक्तेपणाने आपला मुद्दा मांडणे, घरामध्ये अनेक वेळा वाद घालणे आणि तेवढ्याच ताकदीने दिलेला टास्क पूर्ण करणे यासाठी शिवानी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे.

First Published on July 16, 2019 10:22 am

Web Title: shivani surve search increased in google trends leaving behind mahesh manjrekar bigg boss marathi 2 ssv 92