News Flash

“कतरिनाने माझ्याकडे येउन सलमानची तक्रार केली होती”; शोएब अख्तरचा दावा

'या' व्हिडीओमध्ये शोएब अख्तरने बॉलिवूडचे किस्से सांगितले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. परंतु यावेळी कतरिना चक्क पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब अख्तरमुळे चर्चेत आहे. “कतरिनाने माझ्याकडे येउन सलमानबद्दल तक्रार केली होती.” असा दावा शोएबने केला होता.

सर्वाधिक वाचकपसंती – “भाईजानमुळे माझं करिअर वाचलं”; अभिनेत्याने मानले सलमान खानचे आभार

कतरिना सलमानबाबत काय म्हणाली होती?

शोएब अख्तरचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शोएब म्हणतोय, “बंगळूरुमध्ये असताना कतरिना व माझी भेट झाली होती. त्यावेळी कतरिना मला म्हणाली सलमान आणि तुला न्यूजच्या बाहेर ठेवणं अशक्य आहे. तुम्ही दोघं नेहमीच कॉन्ट्रोवर्सीमध्ये असता.” यानंतर त्याने शाहरुख खान आणि इतर बॉलिवूड कलाकारांचे किस्से सांगितले.

सर्वाधिक वाचकपसंती – “कशाला मदत करणार? मृतदेह उचलायला?”: मोदींच्या त्या ट्विटवर दिग्दर्शकाचा संताप

हा २००८चा व्हिडीओ आहे. पाकिस्तानी खेळाडू रमिज राजा यांनी जिओ टीव्हीसाठी शोएब अख्तरची मुलाखत घेतली होती. त्यावेळी बॉलिवूड कलाकारांचे किस्से सांगत असताना शोएबने हा कतरिना सलमानचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी सलमान खान कतरिनाला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. परंतु काही कालावधीनंतर कतरिनाचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले जाउ लागले. परिणामी सलमानसोबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 4:04 pm

Web Title: shoaib akhtar salman khan katrina kaif mppg 94
Next Stories
1 Video : ‘पल में रुला दिया’; इरफान खानच्या आठवणीत दीपिका भावूक
2 लॉकडाउनमध्ये रंगणार पुरस्कार सोहळा? जाणून घ्या, कुठे आणि कधी
3 ‘वो क्युँ उदास हो गई’; मदर्स डेसाठी आयुषमानचं खास गाणं
Just Now!
X