23 September 2020

News Flash

तुझ्या बायकोचा धर्म कोणता? अभिनेत्याने दिले भन्नाट उत्तर, होतेय प्रशंसा

सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना हे घडले आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेता शोएब इब्राहिम आणि त्याची पत्नी दीपिका कक्कर हे सर्वांचे लाडके कपल आहे. सध्या लॉकडाउनमुळे ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. अशातच शोएबने मिळालेल्या वेळात सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शोएबने इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. त्यावेळी एका चाहत्याने दीपिकाचा धर्म विचारला आहे. ‘मला सांग तुझी पत्नी हिंदू आहे की मुस्लीम’ असा प्रश्न विचारला. त्याचा हा प्रश्न पाहून शोएबने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.

‘ती माणूस म्हणून खूप चांगली आहे हे बास नाही का’ असे त्यावर शोएबने उत्तर दिले आहे. त्याने या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी शोएब चाहत्याने विचारलेल्या प्रश्नामुळे चिडला होता.

चाहत्याने दीपिका नेहमी सलवार सूटमध्ये दिसते. तुझ्या कुटुंबीयांनी तिला असे कपडे परिधान करण्यासाठी फोर्स केला आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्याचा हा प्रश्न पाहून शोएबला राग आला आणि त्याला चाहत्याला त्याने चांगलेच सुनावले. ‘या प्रश्नाचे उत्तर देणे मला गरजेचे वाटत नाही. खरं माझ्या पत्नीला आणि मला माहित आहे. बाकी ज्याचे जसे विचार तसे प्रश्न’ असे त्यावर शोएबने उत्तर दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 8:29 pm

Web Title: shoaib ibrahim asked about wife dipika kakar religion gets interesting reply avb 95
Next Stories
1 अभिनेत्रीला क्वारंटाइन केंद्रातच वाटतेय करोनाची भीती, केला व्हिडीओ शेअर
2 गायक उत्कर्ष शिंदेचं सामाजिक भान; कला क्षेत्रातील गरजू कुटुंबांना केलं रेशन वाटप
3 मनोरंजनसृष्टीने सोडला सुटकेचा निश्वास; मुख्यमंत्र्यांनी मागण्यांसंदर्भात केल्या सूचना
Just Now!
X